आरोळे कोव्हीड सेंटरला ५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आ. रोहित पवारांतर्फे बारामती अॅग्रोच्या माध्यमातून सुपूर्द - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, May 1, 2021

आरोळे कोव्हीड सेंटरला ५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आ. रोहित पवारांतर्फे बारामती अॅग्रोच्या माध्यमातून सुपूर्द

 आरोळे कोव्हीड सेंटरला ५० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

आ. रोहित पवारांतर्फे बारामती अॅग्रोच्या माध्यमातून सुपूर्दनगरी दवंडी

तालुका प्रतिनिधी 

नाविन्यपूर्ण व प्रभावी उपाययोजनांद्वारे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी आ.रोहित पवार सतत कार्यरत आहेत. रुग्ण लवकरात लवकर बरा होऊन त्याच्या घरी तो परतावा यासाठी चांगल्या आरोग्य सुविधा पुरवण्यास आ. रोहित पवार कटिबध्द आहेत. याच दृष्टिकोनातून आ. रोहित पवार यांच्यातर्फे सामाजिक बांधिलकीतून बारामती अॅग्रोच्या माध्यमातून ५० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन आज शनिवारी आ.रोहित पवार यांनी आरोळे कोव्हीड सेंटरला सुपूर्द केल्या.कोरोनाबाधित रुग्णावर केल्या जाणा-या उपचारपध्दतीतील ऑक्सीजन थेरपीसाठी ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर उपकरण अतीशय उपयुक्त ठरणार आहे. यापैकी काही उपकरणांसाठी ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रिकल्चरच्या’ (MCCIA) वतीने मदत झाली. यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडे, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, गटविकास अधिकारी पी.पी. कोकणे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील बोराडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संजय वाघ, ज्युलिया हॉस्पिटल चे डॉ रवी आरोळे यांच्यासह इतर अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर' या साधनात इलेक्ट्रिक प्रणालीवर हवा आणि पाण्याद्वारे ऑक्सिजनची निर्मिती केली जाते. एकावेळी पाच लिटर ऑक्सिजन सांभाळण्याची क्षमता असल्याने याचा फायदा गरज असलेल्या कोरोना रुग्णांना होणार आहे. 

कोरोनाबाधित रुग्णांना चांगले उपचार मिळून तो लवकरात लवकर बरा व्हावा हाच अट्टहास कायम राहिलेला आहे. याच दृष्टीकोनातून एका सामाजिक बांधिलकीतून बारामती अॅग्रोच्या माध्यमातून ५० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर  मशीन आज आरोळे कोव्हीड सेंटरला देण्यात आल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here