श्रीगोंदा तालुका शिवसेना युवासेनावतीने कोविड सेंटरला फळवाटप
श्रीगोंदा ः श्रीगोंदा शहर व तालुक्यातील कोंविड सेंटरला फळ वाटप तसेच 100 कुटुंबांना 7 किलोप्रमाणे श्रीगोंदा तालुका शिवसेना युवासेनावतीने अन्नधान्य वाटप करण्यात आले.
श्रीगोंदा शहरातील संत शेख महंमद महाराज कोंविड सेंटर व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय कोंविड सेंटर, श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालय, चांडगाव येथील चांडेश्वर ई कोंविड सेंटर, आढळगाव येथील सिद्धेश्वर कोंविड सेंटर , पारगाव येथील सुद्रिकेश्वर कोंविड सेंटर,लोणी व्यंकनाथ येथील कोंविड सेंटर बेलवंडी येथील कोंविड सेंटर, पिंपळगाव पिसा अजित दादा पवार कोंविड सेंटर, कोळगाव कोंविड सेंटर,घारगाव कोंविड सेंटर येथे फळवाटप करण्यात आले.
या उपक्रमांमध्ये शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे, शिवसैनिक अक्षय खेतमाळीस, शिवसैनिक निलेश गोरे, शिवसैनिक श्रीराम मस्के, युवा सेना उपतालुका प्रमुख शिवाजी दांगडे, शिवसैनिक ऋषिकेश खरात, संभाजी घोडके, दादासाहेब चाकणे, या सर्वांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला.
No comments:
Post a Comment