अनारडे फौंडेशनकडून श्रीगोंद्यात वैद्यकीय साहित्य वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 24, 2021

अनारडे फौंडेशनकडून श्रीगोंद्यात वैद्यकीय साहित्य वाटप

 अनारडे फौंडेशनकडून श्रीगोंद्यात वैद्यकीय साहित्य वाटप


श्रीगोंदा ः
मुंबई येथील अनारडे फौंडेशनने कोवीड रुग्नांसाठी श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी, श्रीगोंदा, आढळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राना सुमारे दोन लाख रुपये किमतीचे वैद्यकीय साहित्य तसेच औषधे देण्यात आले.
मुंबई येथील अनारडे फौंडेशनने तालुक्यातील काष्टी, श्रीगोंदा, आढळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राना ऑक्सीमीटर, वॉटर वेपोरायझर, डिजीटल थर्मामीटर, पॅरासिटामोल, अ‍ॅझिर्थांमायसिनच्या गोळ्या, सॅनिटायझर, फेसमास्क असे सुमारे दोन लाख रुपये किमतीचे औषधे व साहित्याचे वाटप केले. काष्टी येथील आरोग्य केंद्रात फौंडेशनचे प्रतिनिधी निलेश छडीदार, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक रामदास ठाकर, राहूल भंडारी , गणेश जगताप, मोहित धोका,यांचे हस्ते सामाजिक कार्यकर्ते मदन गडदे,डॉ. वैशाली चौधरी, डॉ.कल्याण धुमाळ, डॉ, पल्लवी साबळे यांचेकडे साहित्य सुपूर्द करण्यात आले. श्रीगोंदा येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर, डॉ. राजळे, नगरसेवक समीर बोरा, धनेश गुगळे, दत्तात्रय जगताप, पत्रकार शरद शिंदे यांचे उपस्थितीत देण्यात आले. तसेच आढळगाव येथे डॉ. शेळके, नागवडे कारखान्याचे मा. संचालक सुभाष गांधी, सरपंच बंटी उबाळे, शरद जमदाडे आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment