श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उभारण्यात आलेल्या आरटी-पीसीआर लॅबमध्ये कोविड संशयीत रुग्ण- स्वॅब तपासणी लवकरच होणार सुरु - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, May 22, 2021

श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उभारण्यात आलेल्या आरटी-पीसीआर लॅबमध्ये कोविड संशयीत रुग्ण- स्वॅब तपासणी लवकरच होणार सुरु

 श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उभारण्यात आलेल्या आरटी-पीसीआर लॅबमध्ये कोविड संशयीत रुग्ण- स्वॅब तपासणी लवकरच होणार सुरु


नगरी दवंडी

शिर्डी शहर प्रतिनिधी : 

श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी संचलित रुग्णालयात उभारण्यात आलेल्या आरटी-पीसीआर लॅबमध्ये कोविड संशयीत रुग्णांची तपासणी करणेकरीता एम्स नागपुर यांचे व्दारे AIIMS व ICMR कडून मान्यता मिळालेली असून कोविड संशयीत रुग्णांचे स्वॅब तपासणी चाचणी लवकरच सुरु होणार असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली. श्री बगाटे म्हणाले, सध्या कोरोना विषाणुची दुसरी लाट सुरु असून मोठया प्रमाणात संसर्ग वाढत आहे. त्यामुळे रुग्णांकरीता आरोग्य सेवेवर ताण पडत होता. त्यातच सुरुवातीचे काळात कोविड १९ रुग्णांचे निदान करणेसाठी RTPCR लॅबची कमतरता होती. देणगीदार साईभक्तांच्या देणगीतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प व संस्थानच्या वतीने आरटी-पीसीआर लॅब उभारण्यात आलेली आहे. नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प लोकार्पण व आरटी पीसीआर लॅबचे कार्यान्वयन चाचणी कार्यक्रम ऑनलाईन पार पडला. या लॅबकरीता ICMR कडून मान्यता मिळणेकामी एम्स नागपूर यांचेव्दारे प्रस्ताव पाठवुन पाठपुरावा करुन त्यांच्याकडून मान्यता मिळालेली आहे. सदर लॅबमध्ये ८ तासात एकुण ६०० चाचण्या करण्यात येणार असून भविष्यात ही लॅब २४ तासाकरीता कार्यान्वित करण्याचे नियोजित आहे. या आरटी-पीसीआर लॅबमध्ये कोविड रुग्णांची स्टॅब तपासणी लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे सांगुन शिर्डी व परिसरातील जास्तीत जास्त रुग्णांना या लॅबचा फायदा होणार असून कोविड संसर्ग झालेल्या रुग्णांचे लवकर निदान होवुन त्यांना तातडीने उपचार मिळणे शक्य होणार आहेत. तर याशिवाय चाचणी निष्कर्ष सत्वर मिळाल्यामुळे कोविड-१९ चे संक्रमण नियंत्रणात येणार असल्याचेही श्री. बगाटे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here