वाघाचा आखाडा येथील जाधव महाराजांना प्राजक्त तनपुरे यांनी शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 31, 2021

वाघाचा आखाडा येथील जाधव महाराजांना प्राजक्त तनपुरे यांनी शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला

 वाघाचा आखाडा येथील जाधव महाराजांना प्राजक्त तनपुरे यांनी शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला

नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः वाघाचा आखाडा येथील हनुमान मंदिरात वास्तव करणार्‍या साहेबराव आनंद जाधव महाराजांना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी लक्ष घालून शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला .
जाधव महाराज गावातील या मंदिरात अनेक वर्षांपासून वास्तवाला आहेत.महारांजाना खर्चासाठी गावातील लोक नेहमीच मदत करतात .परंतु दैनदिन व इतर खर्चासाठी महारांजाना खूप अडचण निर्माण होत असे . नुकतीच ना प्राजक्त तनपुरे यांच्या वाघाचा आखाडा दौर्‍यात महारांजाबाबत माहिती समजली मग मदतीची मागणी पुढे आली . तनपुरे यांनी साहेबराव महाराज जाधव यांना महाराष्ट्र शासनाच्या अपंग निराधार कल्याण योजनेत समावेश करून लाभ मिळवून दिला. जाधव महाराजांचे अपंग निराधार योजनेत समावेश झाला आहे . यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता बी.जी.तनपुरे यांनी स्वतः लक्ष देऊन व पाठपुरावा करून पुर्ण केली . जाधव महाराज यांच्या बँक खात्यामध्ये शासनाचा पहिला निराधार योजनेचा निधी वर्ग रु . 1000 झालेला आहे.महारांजाना प्रतीमहा 1000 रू . बँक खात्यात जमा होणार आहे . या सर्व प्रक्रिया पूर्ण होणे कामी आपल्या तालुक्याचे तहसिलदार फसलोद्दीन शेख , ग्रामपंचायत वाघाचा आखाडा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment