राहुरी तालुक्यात पॉझिटिव्ह रेट कमी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 28, 2021

राहुरी तालुक्यात पॉझिटिव्ह रेट कमी

 राहुरी तालुक्यात पॉझिटिव्ह रेट कमी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः राहुरी तालुक्यात आज अखेर 65 हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या असून 19 टक्के इतका पॉझिटिव्ह रेट आहे . एप्रिल महिन्यात हाच रेट 21 टक्क्यांवर गेला होता , गत 8 दिवसातील पॉझिटिव रेट 10 टक्क्यांपर्यंत खाली आलेला आहे.
राहुरी तालुक्यात कोरोनाची पहिली लाट ओसरत नाही तोच दुसर्‍या लाटेने हाहाकार माजवला . आजअखेर तालुक्यात 12 हजार 400 एकूण कोरोना केसेस झाल्या आहेत . त्यात राहुरी शहरात एकूण 2 हजार 761 केसेस झाल्या . तालुक्याच्या हिशोबाने या 22 टक्के आहेत . देवळालीप्रवरा येथे 955 तर वांबोरी येथे 1 हजार 022 केसेस झाल्या आहेत . आरोग्य विभाग व प्रशासनाकडिल प्राप्त माहितीनुसार राहुरी तालुक्यातील 96 गावांपैकी 12 गावांमध्ये कोरोनाच्या दोनशेहून अधिक एकूण केसेस झाल्या आहेत , तर 44 गावात एकूण 50 पर्यंत एकूण केसेस झाले आहेत आणि 20 गावांमध्ये 20पेक्षा कमी एकूण कोरोना पेशंट च्या केसेस झाल्या आहेत . तालुक्यातील केवळ तीन गावात कोरोना महामारी प्रवेश केला नाही हे विशेष आहे!
तालुक्यात आज अखेर 15 हजार 390 ीीं-लिी कोरोना टेस्ट झाल्या आहेत , 35 हजार रॅपिड टेस्ट झाल्या . यात ीीं-लिी पेक्षा अँटिजेन रॅपिड टेस्ट पेक्षा दुप्पट आहे . खाजगी ीीं-लिी च्या देखील 13 हजार 722 टेस्ट झाले आहेत . एकूण 64 हजार 640 कोरोना टेस्ट पूर्ण झाल्या , त्यापैकी 12 हजार 401 केसेस निघाल्या . या पॉझिटिव्ह प्रमाण 19.08 टक्के इतके आहे तर आज अखेर तालुक्यातील 181 जणांचा कोरोनाने दुर्दैवी मृत्यू झाला आहे . एप्रिल महिन्यात 1 हजार 859ीीं-लिी , 7 हजार 284 रॅपिड टेस्ट झाल्या आहेत . एकूण 9 हजार 143 टेस्ट पैकी 1 हजार 929 पॉझिटिव्ह केसेस निघाल्या . एप्रिल महिन्याचा पॉझिटिव रेट 21 टक्के पर्यंत गेला . मागील 8 दिवसात 2 हजार 626 ीीं-लिी टेस्ट तर 4 हजार 543टेस्ट झाल्या . एकूण 7 हजार 169 पैकी 667 पॉझिटिव्ह केसेएस आढळून आल्या . हा पॉझिटिव्ह रेट कमी होत दहा टक्क्यांपर्यंत खाली आल्याचे प्राप्त माहितीमध्ये दिसून आले.
सध्या तालुक्यातील बाभुळगाव , राहुरी खुर्द (राजेश्वर कॉलनी ), कोल्हार खुर्द (गावठाण ) या तीन ठिकाणी प्रशासनाने कंटेनमेंट झोन घोषित केला आहे . राहुरी तालुक्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी होताना दिसत असली तरी नागरिकांनी नियम पालन करून काळजी घ्यावी , असे आवाहन स्थानिक प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने वारंवार करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment