राहुरी नगरपालिकेकडून 8 दिवसांत विनाकारण फिरणार्‍यांची कोरोना चाचणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, May 27, 2021

राहुरी नगरपालिकेकडून 8 दिवसांत विनाकारण फिरणार्‍यांची कोरोना चाचणी

 राहुरी नगरपालिकेकडून 8 दिवसांत विनाकारण फिरणार्‍यांची कोरोना चाचणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः राहुरी शहरात नगरपालिका पथकाने गेल्या आठ दिवसात 1 हजार 600 विनाकारण फिरणार्‍यांची कोरोना चाचणी केली . त्यात पॉझिटिव्ह असणार्‍या सहा नागरिकांना सेंटरला दाखल करण्यात आले.
राहुरी तालुक्यातील रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत नाही , दुसरीकडे विनाकारण फिरणार्‍याच्या चाचण्यांमध्ये पॉझिटिव्हचे प्रमाण नगण्य आहे ! मग ही रुग्णसंख्या कशामुळे वाढत आहे ? असा प्रश्न शहरात विनाकारण विचारण्यात येत आहे ?
राहुरी शहरात लोकडाऊन सारखे कडक निर्बंध असले तरी सकाळच्या सत्रामध्ये शहरातील नवी पेठ , बाजारपेठ ,शनि मंदिर चौक ,नगर -कोपरगाव महामार्ग, मल्हारवाडी रस्ता , प्रगती विद्यालय रस्ता ,भागीरथीबाई तनपुरे विद्यालय रस्त्यावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात भाजीपाला व ग्रह उपयोगी वस्तू घेण्यासाठी मोठी वर्दळ होत आहे . जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार राहुरी तहसीलदार , मुख्याधिकारी , यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पालिकेचे पथकाचे गेल्या आठ दिवसापासून बाजार समिती , जुने ग्रामीण रुग्णालय समोर विनाकारण फिरणार्‍या नागरिक ,महिलांची अँटीजेन चाचण्या करण्यात सुरुवात केली आहे .
तरीही शहरातील गर्दी नियंत्रणामध्ये येत नसल्याने चित्र दिसून येत आहे. पालिकेचे कर निरीक्षक महेंद्र ताकपिरे, यांच्यासह सहकारी काकासाहेब शिरसाट ,राजेंद्र खंगले, सुनिल कुमावत ,शीला राहिंज , ज्ञानेश्वरी तंटक , रवींद्र सरोदे , दीपक विधाटे, राजू शेख , लक्ष्मण भालेराव यांच्या यांच्या पथकाने 1 हजार 600 नागरिकांच्या अँटिजेंन चाचण्या केल्या . त्यापैकी केवळ सहा जण पॉझिटिव्ह आढळून आले . गेल्या दोन दिवसात शंभराच्या खाली तालुक्यात रुग्णसंख्या आली , व पुन्हा शंभराच्या वर गेली आहे . त्यामुळे केवळ विनाकारण फिरनार्‍याच्या कारवाई करण्यापेक्षा छूप्या पद्धतीने व्यवसाय करणारे , खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या संपर्कातील तसेच अनेक घरात विलगीकरणतील व त्यांच्या संपर्कातील लोकांच्या चाचण्या कराव्यात अशी मागणी केली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here