राहुरीत विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍यांची अँटीजेन चाचणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, May 20, 2021

राहुरीत विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍यांची अँटीजेन चाचणी

 राहुरीत विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍यांची अँटीजेन चाचणी

नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः शासनाने कोरोनाची महामारी रोखन्यासाठी विविध उपाय योजना राबवूनही विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍यांची संख्या काही कमी होईना म्हणून त्या विनाकारण रस्त्यावर फिरणार्‍याविरुद्ध राहुरी नगरपालिकेच्यावतीने काल कडक मोहीम राबवून शहरात रॅपिड अँटीजेन चाचणी सुरु केल्याने विनाकारण फिरणार्‍यांना चाप बसला आहे .
सदर कारवाई पालिकेच्या वतीने सुरूच राहणार असल्याची माहिती उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी यांनी दिली . कोरोनाची महामारी रोखण्यासाठी राहुरी नगरपालिकेने राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाय योजना राबविण्यात आल्या . मंगळवारी राहुरी नगरपालिकेच्या वतीने शहरात नगरपालिका कर्मचारी यांचे एक पथक सोबत आरोग्य विभागाचे व पोलीस कर्मचारी यांना बरोबर घेऊन उपनगराध्यक्ष सूर्यकांत भुजाडी स्वतः रुग्णवाहीकेसह शहरात फिरत होते . शहरातील विविध प्रमुख रस्त्यावर थांबून विनाकारण फिरणार्‍या लोकांवर कारवाई करत होते . कारवाई करताना संबंधित व्यक्ती रॅपिड टेस्ट करण्यासाठी रुग्णवाहाकेत बसवून चाचणी करत असल्याचे पाहताच अनेक विनाकारण फिरणारे युवक धूम ठोकून पळून जात होते.या पथकाने रस्त्याने जाणार्‍या येणार्‍यासह बाजार पेठेतील व्यापारी तसेच दुकानातील नोकर यांची चाचणी केली.
दिवस भरात जवळपास 79 जणांची रॅपिड टेस्ट केली , त्यात 2 जण पॉझिटिव्ह निघाले असून त्यांची रवानगी कोविड सेंटरमध्ये करण्यात केली . यावेळी नगर पालिकेचे अधिकारी महेंद्र तापकीर , वसुली अधिकारी भाऊसाहेब शिरसाठ , सुनील कुमावत , राजू खगले , पो . कॉ . कोरेगावकर सहभागी झाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here