मुळा धरणसाठा निम्म्यावर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 18, 2021

मुळा धरणसाठा निम्म्यावर

 मुळा धरणसाठा निम्म्यावर

राहुरी ः नगर जिल्ह्यातील सर्वाधिक समतेच्या मुळा धरणाचा पाणीसाठा आता निम्म्यावर आला आहे आज सकाळी धरणसाठा 12 हजार 980 दशलक्ष घनफूटावर पोहोचला होता. सध्या धरणातून शेतीसिंचनासाठीचे शेवटचे उन्हाळी आवर्तन सुरू आहे. मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून शेतीसिचंनाचे शेवटचे उन्हाळी आवर्तन 1 हजार 653 क्युसेक्सने सोडण्यात येत आहे . तर डाव्या कालव्यातून राहुरी तालुक्यातील शेतीला 150 क्यूसेक ने आवर्तन सुरू आहे. आतापर्यंत एक टीएमसी पाणी खर्ची झाले आहे. उजव्या कालव्याचे सुमारे 40 दिवस आवर्तन राहणार आहे. यामुळे सुमारे 30 हजार हेक्टर शेतीक्षेत्र ओलिताखाली येणार आहे. नगर जिल्ह्यात सर्वांत मोठे व जिल्ह्याचे जलसंजिवनी म्हणून ओळखले जाणारे मुळा धरण 26 हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेचे आहे. आजमितीला धरणात 12 हजार 980 दशलक्ष घनफूट (50 %) पाणी साठा शिल्लक आहे. त्यापैकी 8 हजार 400 इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

No comments:

Post a Comment