स्नेहबंध 85 व मनपा दक्षता पथकाकडून किरणा किटचे वाटप. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, May 27, 2021

स्नेहबंध 85 व मनपा दक्षता पथकाकडून किरणा किटचे वाटप.

 स्नेहबंध 85 व मनपा दक्षता पथकाकडून किरणा किटचे वाटप.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गरीब वयस्कर महिला,लहान मुलगी केवळ घरात अन्न धान्य नाही,कमवता व्यक्ती नाही म्हणून रस्त्यावर कोरोनाचा धोका पत्करून भाजी,अंडी विक्री करतात. त्यांच्या या समस्या दक्षता पथक प्रमुख श्री.शशिकांत नजान यांनी समजून घेऊन स्नेहबंध 85 या ग्रुप चे सदस्य श्री.श्रेणीक शिंगवी यांना सांगितले असता.या  गरजू,गरीब ,निराधार नागरिकांना किराणा किट वाटप करण्यात यावे या साठी पुढाकार घेऊन किराणा किट उपलब्ध करून दिल्या. महापालिका अधिकारी कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडत असताना सामाजिक जाणीव जिवंत ठेवत आहेत या शब्दात मा.आयुक्त श्री.शंकर गोरे,मा. उपायुक्त श्री.यशवंत डांगे यांनी या उपक्रमाचे स्वागत केले.   परंतु नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत कोरोना नियमावलीचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे असेही त्यांनी संगितले.
स्नेहबंध 85 या ग्रुपच्या वतीने मा. श्री.श्रेणीक शिंगवी ,किरण निकम ,प्रवीण मुनोत,नुतन फिरोदिया,मनीष मुथा,शिल्पा रसाळ,अभय शेटे, राजेंद्र लोणकर,प्रशांत पाटील व त्यांच्या सहकार्यांनी किराणा किट महापालिका कोरोना दक्षता प्रमुख श्री.शशिकांत नजान,सहाय्यक श्री.सूर्यभान देवघडे यांच्या उपस्थितीत गरजूंना वाटप केले . यावेळी बोलताना श्री.शशिकांत नजान म्हणाले की गर्दी होऊ नये,सोशल डिस्टन्सचे पालन व्हावे,कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी कडक नियमावली असून नागरिकांनी उदरनिर्वाह साठी धोका पत्करू नये. कोरोना मुक्त शहरासाठी महापालिका प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांची साथ अतिशय महत्वाची आहे.
यावेळी बोलताना श्रेणीक शिंगवी म्हणाले की कर्तव्या बरोबर सामाजिक बांधिलकी जपणारे महापालिका अधिकारी समाजा समोर आदर्श निर्माण करीत आहेत अशी भावना  शिंगवी यांनी व्यक्त केली.
अहमदनगर महानगरपालिका कोरोना काळात विविध स्तरावर कार्य करीत आहे.याच बरोबर गर्दी करणारे,मास्कचा वापर न करणारे,कोरोना नियम मोडणारे नागरिकांवर दंडात्मक कारवाई दक्षता पथकाच्या वतीने करण्यात येते. हे काम करीत असताना अनेक ठिकाणी सूचना देणे, नागरिकांच्या समस्याच समजून घेणे मनपा प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय असावा हा हेतूही दक्षता पथकाचा आहे. व हा हेतू दक्षता पथकाकडून पाळला जात आहे विनाकारण शहरातील कोणत्याही नागरिकांना त्रास दिला जात नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here