पोलीस गस्तीचे वाहन होणार ऑक्सिजनयुक्त - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 25, 2021

पोलीस गस्तीचे वाहन होणार ऑक्सिजनयुक्त

 पोलीस गस्तीचे वाहन होणार ऑक्सिजनयुक्त

घर घर लंगरसेवेच्या वतीने पोलीस दलास दोनशे ऑक्सिजन कॅनची भेट

 जिल्ह्यात गस्त घालणार्या पोलीसांच्या 40 वाहनामध्ये प्रत्येकी 5 ऑक्सिजन कॅन प्रमाणे दोनशे ऑक्सिजन कॅन पोलीस प्रशासनास देण्यात आले आहे. पोलीसांना अनेक गरजू रुग्ण मिळत असतात, ज्यांना ऑक्सिजनची गरज असते. अशा रुग्णांना लंगर सेवेचे ऑक्सिजन पुरविण्याचे काम पोलीस प्रशासन करणार आहेत. पोलीस प्रशासनाचे गस्तीचे चारचाकी वाहन ऑक्सिजनयुक्त राहणार आहे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गरजूंना दोन वेळचे जेवण पुरविणार्या घर घर लंगर सेवेच्या वतीने रुग्णसेवा देखील सुरु असून, कोरोनाच्या दुसर्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना गरजू रुग्णांना ऑक्सिजनचे कॅन वाटप सुरु आहे. लंगर सेवेच्या वतीने अहमदनगर पोलीस दलास दोनशे ऑक्सिजन कॅन देण्यात आले. गस्त घालणारे पोलीसांचे चारचाकी वाहन ही ऑक्सिजनची सेवा गरजू रुग्णांपर्यंत घेऊन जाणार आहेत.  
पोलीस अधीक्षक कार्यालयात लंगर सेवेच्या सेवादारांनी पोलीस अधिक्षक मनोज पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्याकडे ऑक्सिजनचे कॅन सुपुर्द केले. यावेळी लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, प्रितपालसिंग धुप्पड, राहुल बजाज, किशोर मुनोत, जय रंगलानी, मनोज मदान, सतीश गंभीर, राजा नारंग, करण धुप्पड, राहुल शर्मा, नारायण अरोरा, अर्जुन मदान, सुनील थोरात, सुरज तोरणे, पुरुषोत्तम बेत्ती, शरद बेरड, प्रमोद पंतम, राजबीरसिंग संधू, संदेश रपारीया, प्रशांत मुनोत, सिमर वधवा, कैलाश नवलानी, राजवंश धुप्पड, मन्नू कुकरेजा, टोनी कुकरेजा, गोविंद खुराणा आदी उपस्थित होते.
पोलीस अधिक्षक मनोज पाटील म्हणाले की, घर घर लंगर सेवेच्या माध्यमातून जनसेवा घडत आहे. कोरोनाच्या संकटकाळात समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत लंगर सेवेच्या सेवादारांनी मदत पोहचवली आहे. त्यांचे कार्य अतुलनीय असून, या ऑक्सिजनच्या सेवेद्वारे अनेक गरजूंना जीवदान मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हरजितसिंह वधवा यांनी ऑक्सिजन पातळी घटलेल्या रुग्णांना ऑक्सिजन कॅनचा मोठा आधार मिळत आहे. ऑक्सिजन कॅनला मागणी असून, गस्त घालणारे पोलीसांचे वाहन अनेक गरजू रुग्णांपर्यंत ही सेवा घेऊन जाणार आहे. पोलीस अधिक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम कार्यान्वीत केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment