नगरसेवक शाम नळकांडे यांच्या प्रयत्नांना यश... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 24, 2021

नगरसेवक शाम नळकांडे यांच्या प्रयत्नांना यश...

 नगरसेवक शाम नळकांडे यांच्या प्रयत्नांना यश...


अहमदनगर -
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे लसीकरणासाठी कल्याण परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ नये. तसेच परिसरातील एकही नागरिक लसीकरणापासून वंचित राहू नये याकरिता नगरसेवक शाम नळकांडे यांनी मनपा आयुक्त व आरोग्य अधिकारी यांच्याकडे कल्याण रोड परिसरात लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी दि. 6 मे रोजी एका निवेदनाद्वारे केली होती.
 मनपा आयुक्त व आरोग्य अधिकारी यांनी या मागणीची दखल घेत कल्याण रोड परिसरातील श्री बालाजी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, कल्याण रोड, शिवाजीनगर येथे तोफखाना नागरी आरोग्य केंद्राशी संलग्न लसीकरणासाठी उपकेंद्र म्हणून परवानगी दिली आहे. लसीचा उपलब्धतेनुसार या उपकेंद्रावर लस पुरवठा करण्यात येईल. तरी नागरिकांनी प्रशासनाने लावून दिलेल्या नियमांचे पालन करत लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आव्हान नगरसेवक शाम नळकांडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment