डॉन बॉस्कोसह प्रत्येक प्रभागात मान्यताप्राप्त लसीकरण केंद्र सुरू करण्याची काँग्रेसची मनपाकडे मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 17, 2021

डॉन बॉस्कोसह प्रत्येक प्रभागात मान्यताप्राप्त लसीकरण केंद्र सुरू करण्याची काँग्रेसची मनपाकडे मागणी

 डॉन बॉस्कोसह प्रत्येक प्रभागात मान्यताप्राप्त लसीकरण केंद्र सुरू करण्याची काँग्रेसची मनपाकडे मागणी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर गर्दी होत आहे. यात सुयोग्य नियोजन होण्यासाठी 17 प्रभागांमध्ये 17 केंद्र सुरू करण्याच्या दृष्टीने डॉन बॉस्कोसह अन्य नवीन 7 ठिकाणी मान्यताप्राप्त लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावीत. प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र केंद्र सुरू करून पारदर्शकतेसाठी प्रत्येक केंद्रावर सीसीटिव्ही बसवत, ऑडिटर, दक्षता पथक नेमावेत अशी मागणी काँग्रेसचे शहर जिल्हा सहसचिव गणेश आपरे यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गणेश आपरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, मनपाचे आज मितीस सुरू असणार्‍या मान्यताप्राप्त नऊ केंद्राबरोबरच नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने सावेडीतील डॉन बॉस्को केंद्रासह शहरात अन्य सात ठिकाणी केंद्रांची नव्याने अधिकृतरित्या सुरुवात करण्यात यावी. केंद्र सरकारच्या नोंदणी पवर सतरा प्रभागांतील सतरा मान्यताप्राप्त लसीकरण केंद्रांची नावे उपलब्ध असावीत. जेणेकरून नागरिकांना आपल्या प्रभागासाठी असणार्‍या केंद्राची ऑनलाईन निवड करता येईल. लसीकरण केंद्रांवर नियोजन योग्य होण्याच्या दृष्टीने तसेच प्रक्रियेत पारदर्शकता असण्याच्या दृष्टीने काँग्रेसने मनपाला काही पर्याय सुचविले आहेत. प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. जेणेकरून सदर केंद्रांवर सुरू असणारा लसीकरणाच्या वशिलेबाजीचा गोंधळ आटोक्यात येईल. ज्याप्रमाणे हॉस्पिटलमध्ये वाढीव बिलांच्या प्रश्नांसंदर्भात मनपाच्या वतीने ऑडिटर्स नेमण्यात आले आहेत त्याच पद्धतीने प्रत्येक केंद्रावर स्वतंत्र ऑडिटर नेमून त्याच्यावरती सदर केंद्रावर कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही याची जबाबदारी सोपवण्यात यावी.
केंद्र सरकारच्या पवर नोंदणी केलेल्या नागरिकांची यादी केंद्रांवर सातत्यपूर्णरित्या दररोज प्रकाशित करावी. नोंदणी केलेल्या नागरिकांनाच लस दिली जात आहे की नाही याची रोजच्या रोज ऑडिटरने पडताळणी करावी. तसेच लसीकरण प्रक्रियेमध्ये कोणी राजकीय हस्तक्षेप करत असल्यास तात्काळ वरिष्ठांना लेखी कळवत योग्य ती कायदेशीर पावले उचलण्याची जबाबदारी ऑडिटरवर सोपवण्यात यावी. लसीकरण केंद्रांसाठी दक्षता पथक नेमण्यात यावे. या पथकामध्ये मनपाच्या अधिकार्‍यांसह सर्व प्रभागातील पक्षांचे नगरसेवक तसेच सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकार, पोलीस यांचा समावेश असावा. दक्षता पथकातील सदस्यांची नावे व संपर्क क्रमांक हे समाज माध्यमांद्वारे नागरिकांसाठी प्रमाणावर व्हायरल करण्यात यावेत.पथकांच्या माध्यमातून केंद्रांवर वचक ठेवण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here