मुलतानचंद बोरा ट्रस्ट व फिरोदिया ट्रस्ट पुणे यांनी जिल्हा रुग्णालय व बूथ हॉस्पिटलला दहा ऑक्सीजन तयार करणाऱ्या मशीन व चार व्हेंटिलेटर मशीन सुपूर्त - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Sunday, May 2, 2021

मुलतानचंद बोरा ट्रस्ट व फिरोदिया ट्रस्ट पुणे यांनी जिल्हा रुग्णालय व बूथ हॉस्पिटलला दहा ऑक्सीजन तयार करणाऱ्या मशीन व चार व्हेंटिलेटर मशीन सुपूर्त

 मुलतानचंद बोरा ट्रस्ट व फिरोदिया ट्रस्ट पुणे यांनी जिल्हा रुग्णालय व बूथ हॉस्पिटलला दहा ऑक्सीजन तयार करणाऱ्या मशीन व चार व्हेंटिलेटर मशीन सुपूर्त

मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा-डॉ. विजय पितळेनगरी दवंडी


अहमदनगर प्रतिनिधी- देशासह जिल्ह्यावर आलेले कोरोनाचे संकट भयानक आहे या संकट काळामध्ये नागरिक भयभीत झाले आहे. नगर जिल्ह्यातील शासकीय यंत्रणेने बरोबर आरोग्य विभाग झोकून काम करत आहे अनेक रुग्ण बरे होऊन घरी जात आहे.कोरोनाचे अतिदक्ष रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्यामुळे त्यांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची खरी गरज पडत आहे. परंतु काही रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने उपचाराअभावी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा मृत्यू दर कमी करण्यासाठी समाजातील मुलतानचंद बोरा अहमदनगर ट्रस्ट यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे येऊन गरजू कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येथे पाच ऑक्सिजन तयार करण्याची मशीन व दोन व्हेंटिलेटर मशीन संस्थेचे चेअरमन डॉ. विजय पितळे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा याच्या कडे सुपूर्त केले.

        नगर जिल्ह्यावर जेव्हा-जेव्हा कुठली आपत्ती येते तेव्हा-तेव्हा नगर शहरातील बूथ हॉस्पिटलने पुढे येऊन मदतीचा हात दिला गेल्या एक वर्षापासून कोरोना संकटकाळात बूथ हॉस्पिटलने कोरोना रुग्णांवर मानवसेवेतून उपचार करून सर्व रुग्ण बरे केले. त्यांच्या या कामाला फिरोदिया ट्रस्ट पुणे यांनी दोन व्हेंटिलेटर मशीन व पाच ऑक्सिजन तयार करणाऱ्या मशीन बूथ हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी मेजर देवदान कळकुंबे यांच्याकडे सुपूर्त केले यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुनील पोखरणा व बूथ हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी मेजर देवदान कळकुंबे यांनी ट्रस्टचे आभार मानून कोरोनाच्या संकट काळामध्ये ज्या रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटर ची खरी गरज आहे त्या वस्तू भेट देऊन एक मानवतेचा संदेश दिला.यावेळी रोहन गांधी,अशोक भांडरी, सुशील सारडा,डॉ. प्रशांत गायकवाड,डॉ. प्रशांत पितळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment