बोकड चोर टोळी गजाआड.
7 गुन्हे उघडकीस, अनेक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद.
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः बोकड चोरणारांची टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पकडली असून शेतकर्यांच्या बकर्या व बोकड चोरणारे व विकत घेणार आरोपी जेरबंद केले असून सात गुन्हे उघडकीस आले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे. आरोपीमध्ये नितीन जयशिंग काळे, वय- 35 वर्षे, रा. जावळे मळा, पोखडी शिवार, ता. नगर ,दान्या फाजल्या चव्हाण, वय 50 वर्षे, रा. जावळे मळा, पोखर्डी शिवार, ता. नगर, संजय दान्या चव्हाण, वय- 22 वर्षे, रा. सदर व एक विधीसंघषित बालक यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. शकील शेख व महमंद शेख, दोघे रा. झेंडीगेट , शकील बाबू शेख, वय- 54 वर्षे, रा. इदगाह मैदान, झेंडीगेट नगर,महमंद हनिफ शेख नजीर, वय 35 वर्षे, रा. नगर यांचा समावेश आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, राजेन्द्र आसाराम माटे, वय 32 वर्षे, रा. पोखर्डी, ता. नगर हे त्यांच्या बकर्या व बोकड घरासमोर बांधून झोपले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचा 6,000/-रु. किं. चा बोकड चोरुन नेला होता. त्याबाबत एमआयडीसी पो.स्टे. येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा करण्यात आलेला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल कटके, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नगर यांना माहिती मिळाली हा गुन्हा हा नितीन काळे, रा. पोखर्डी शिवार याने व त्याचे साथीदाराने मिळून केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, सफीमन्सूर सय्यद, सोन्याबापू नानेकर, संदीप घोडके, शंकर चौधरी, शिवाजी ढाकणे, रविन्द्र घुंगासे, रोहीदास नवगीरे, उमाकांत गावडे, यांनी आरोपींचा शोध घेवून आरोपी नितीन जयशिंग काळे, वय- 35 वर्षे, रा. जावळे मळा, पोखडी शिवार, ता. नगर यांस प्रथम ताब्यात घेतले. त्याचेकडे गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा हा त्याचे साथीदार दान्या चव्हाण, संजय चव्हाण व एक अल्पवयीन साथीदार अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. त्यावरुन आरोपींचा शोध घेवून वरील आरोपी नितीन जयशिंग काळे, दान्या फाजल्या चव्हाण, संजय दान्या चव्हाण व विधीसंघर्षित बालक यांना विश्वासात घेवून आणखी कोठे कोठे बकन्या चोरी केलेल्या आहेत याबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी तोफखाना, एमआयडीसी व नगर तालूका हद्दीतून बकन्यांची चोरी केली असल्याची माहिती सांगीतली. त्यावरून तोफखाना, नगर तालूका व एमआयडीसी पो.स्टे. चे वर नमुद गुन्ह्यासह एकूण 07 गुन्हयामध्ये आरोपींचा सहभाग निष्पन्न झालेला आहे.
आरोपी विरुद्ध एमआयडीसी पो.स्टे. एमआयडीसी पो.स्टे. तोफखाना पो.स्टे. नगर तालुका पो.स्टे. भिंगार कॅम्प पो.स्टे. येथे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. नमुद आरोपी व विधीसंघर्षित बालक यांना मुद्देमालासह एमआयडीसी पो.स्टे. ला हजर करण्यात आले. पुढील कार्यवाही एमआयडीसी पो.स्टे. करीत आहे. ही कारवाई मनोज पाटिल ,पोलीस अधीक्षक, सौरभ कूमार अग्रवाल,अपर पोलीस अधीक्षक, अजित पाटील , उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग, अ.नगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
No comments:
Post a Comment