कोरोना विषाणूच्या लढाईत निनादीयन समाजसेवकांचे बहुमोल योगदान - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 27, 2021

कोरोना विषाणूच्या लढाईत निनादीयन समाजसेवकांचे बहुमोल योगदान

 कोरोना विषाणूच्या लढाईत निनादीयन समाजसेवकांचे बहुमोल योगदान


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः निनाद संस्थेतर्फे कोरोना काळात समाजातील गरजू व्यक्तींना उपयुक्त असे अनेक उपक्रम राबिवण्यात आले आहेत. तरुणांच्या एकीने आणि बहुमोल सहभागाने कोरोना पार्श्वभूमीवर ‘निनाद फाऊंडेशन’ चे समाजकार्य कौतुकास्पद ठरले आहे त्याचबरोबर सर्वात महत्त्वाच म्हणजे गोर गरिबांसाठी उपयुक्त बनले आहे. कोरोना विषाणूमुळे भीतीचा थरकाप उडाला होता, या काळात कोरोना संक्रमण कशाप्रकारे होतो? या संक्रमनापासून वाचण्याकरिता कोणत्या दक्षता घ्याव्या? या प्रश्नांची खात्रीशीर उत्तरे सर्वांपर्यंत विविध पोस्टर, व्हीडिओ मार्फत पोहचवून जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आला.
कोरोना परिस्थितीत अनेक कुटुंबाची फरफट होत असल्याचे निनाद फाऊंडेशनमधील युवकांच्या निदर्शनास आले, त्यामुळे प्रत्येक सदस्याने आपआपल्या गावामध्ये काटेकोर नियोजनाने आणि नियमांचे पालन करून अन्न धान्य, सॅनिटाईजर, मास्क याचे वाटप इ. उपक्रम घडवून आणले. महामारीच्या काळात मास्क, सॅनिटाईजर यांच्या नियमित वापराचा आभाव निनाद फाऊंडेशन मधील युवकांना जाणवलं यामुळेच कोरोना फैलावास साथ मिळत होती, हे थांबण्यासाठी मास्क सॅनिटाईजर इ
सुरक्षितेत च्या वस्तूंचे वाटप करून ते वापरण्याचे आणि सर्व नियम पाळण्याचे आवाहन निनाद फाऊंडेशन कडून करण्यात आले
 कोरोना च्या काळात बेड उपलब्ध नसल्याने अनेक बळी जात आहेत, काही ठिकाणी अजून बेड ची उपलब्धता आहे, परंतु पुरेपूर माहिती नसल्याने गरजू व्यक्तिना हे उपलब्ध होत नव्हते या परिस्थितीचा अंदाज निनाद फाऊंडेशन, तर्फे घेण्यात आला व व्हेंटिलेटर बेड, खउण बेड, ऑक्सिजन बेड, ळीेश्ररींळेप बेड ची उपलब्धता करून देण्यात आली, दिनांक 28 एप्रिल ते 25 मे 2021 पर्यंत जवळ जवळ 13,059 बेड ची खात्रीशीर उपलब्धता निनादीयन ने गरजूंपर्यंत वेळेआधी पोहचवून अनेक जीव वाचवले आहेत आणि हे काम असेच चालू राहणार आहे.
याचबरोबर अनेक गरजवंतांच्या हाल अपेष्टा कमी करण्याच्या हेतूने अन्नदान व इतर आवश्यक साहित्य वाटपाचा उपक्रम निनाद मधील युवा तरुणांच्या नियोजनाने राबवत आहेत. ‘निनाद फाऊंडेशन39; ने, त्यांच्या या कार्याचा उपभोक्ता वर्ग निश्चित केला आहे तो- 39;कमवाव तेव्हा खावं39; अशी परिस्थिती असणारा असा वर्ग, आशा वर्गासाठी बातम्या पाहून हळहळ व्यक्त केल्याने त्यांची जीवन-मरणाची सध्याची लढाई संपुष्टात येणार नाही. या माणसांना ही जगण्याचा तेवढाच अधिकार आहे जेवढा इतरांना आहे, आर्थिक सक्षमता सर्व कारणांचे मूळ आहे, पण आर्थिक सक्षमता नाही म्हणून या गोर गरिबांनी का म्हणून जीवाचे बलिदान द्यावे?
यात त्यांची काही चूक नसताना, माझा देश माझा महाराष्ट्र संकटात असताना मी शांत बसु शकत नाही! आम्हां तरुणांचे तारुण्य देश संकटात असताना आपल्याच माणसांच्या मदतीस उपयोगी नाही पडल तर काय उपयोग या तारुण्याचा ? परिस्थिती कोणतीही असो, कितीही मोठे संकट जरी आले तरी या पावन, पवित्र,
कोरोना महान महाराष्ट्रातील तरुण या महाराष्ट्राला आणि देशाला डगमगू देणार नाही! असे उद्गार ‘निनाद फाऊंडेशन’ चे 39;कार्यकारी मंडळ प्रमुख39; 39;मा.श्री.अजय भोसले39; यांनी केले.
 हातावर पोट असणार्‍या व्यक्तींना दोन वेळेचा पौष्टिक आहार पुरविणे.गरजू व्यक्तीने एका आठवड्याचे किंवा एका महिन्याचे किराणा साहित्य पुरविणे.करोना बाधित रुग्णांच्या कुटुंबियांना फळभाज्या व पालेभाज्या देणे.करोना विषाणू पासून संरक्षण करण्यासाठी मास्क व सॅनिटायझरचे वाटप करणे.
‘आळंदी, पर्वती, हडपसर, दौंड, उदगीर’ या ठिकाणी हे उपक्रम पार पडणार आहे, भाग्यश्री बोराटे, अनामिका किलजे,श्री. विशाल देशमुख, शीतल जाधव, भाग्यश्री देशमुख, सुयश यादव, सचिन खडके, अक्षदा कांबळे, वैभवी सोनवणे, प्रिया आढाव इ.’ व्यक्ती या ठिकाणी नेतृत्व करणार आहेत. परिस्थिती कोणतीही असो,कितीही मोठे संकट आले तरी आम्ही नीनादीयन आपल्या माणसांची साथ सोडणार नाही असे उद्गार या युवा नेतृत्वांनी काढले आहे. वरील काही अत्यावश्यक बाबी आहेत जे या महामारीच्या काळात गरजूंना जीवनदान देण्यास मदत करत आहेत, समाजातील प्रत्येक व्यक्तिच्या जिवाची सुरक्षितता ही आपली जबाबदारी समजून निनाद फाऊंडेशन ने या पवित्र कार्यास प्रामाणिकपणे पार पाडण्याचे पुरेपूर नियोजन केले आहे, या कार्यात आपणही सहभाग घ्यावा असे आवाहन या युवा तरुणांनी समाजातील प्रत्येकास केले आहे.

No comments:

Post a Comment