शहरांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करा- सभापती लताताई शेळके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 24, 2021

शहरांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करा- सभापती लताताई शेळके

 शहरांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करा- सभापती लताताई शेळके




अहमदनगर प्रतिनिधी -महिला आपले कुटुंब सांभाळून पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रांमध्ये काम करत असतात,त्यामुळे त्या महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे महिलां मधील रोग प्रतिकारक शक्ती कमी असते कोरोना संसर्ग विषाणूच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या लसीकरणा प्राधान्यक्रम देऊन शहरामध्ये विविध ठिकाणी महिलांचे लसीकरण केंद्र सुरू करावे सुरू करावे अशा मागणीचे निवेदन आयुक्त शंकर गोरे यांना मनपा महिला बालकल्याण समितीच्या सभापती लताताई शेळके यांनी दिले.

        दिलेल्या निवेदनात म्हटले की, प्रभाग क्रमांक १७ हा विस्ताराने मोठा प्रभाग आहे. नागरिक वाड्या-वस्त्यांवर राहतात त्यामुळे नागरिकांच्या लसीकरनास अडचण निर्माण होते. प्रभाग क्रमांक १७ मध्ये कायनेटिक चौक परिसर लक्ष्मी कृपा हौसिंग सोसायटी, छाया नगर प्रियंका कॉलनी अजय गॅस गोडाऊन मागील परिसर,डिंमळेमळा,पांजरपोळ, अचानक वस्ती, मल्हार चौक परिसरातील नागरिक, रविश सारस कॉलनी आधी सर्व परिसरया प्रभागांमध्ये मोडतात मोठी लोकवस्ती असल्याने प्रभाग क्रमांक १७ मधील कायनेटिक चौकातील रविस सारस कॉलनी गणपती मंदिर व इंदिरा नगर शाळेमध्ये 2 लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

No comments:

Post a Comment