मुकुंदनगर येथे लसीकरण व कोरोना टेस्ट केंद्र सुरू करण्याची मागणी- नगरसेवक आसिफ सुलतान. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, May 21, 2021

मुकुंदनगर येथे लसीकरण व कोरोना टेस्ट केंद्र सुरू करण्याची मागणी- नगरसेवक आसिफ सुलतान.

 मुकुंदनगर येथे लसीकरण व कोरोना टेस्ट केंद्र सुरू करण्याची मागणी- नगरसेवक आसिफ सुलतान.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः प्रभाग क्रमांक 3 मुकुंदनगर मध्ये लसीकरण केंद्र व आरएटी व आरटीपीसीआर टेस्ट स्वतंत्र वेगवेगळे केंद्र सुरू करण्याची मागणी नगरसेवक आसिफ सुलतान यांनी उपायुक्त डॉ.प्रदीप पठारे यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी केली आहे.
प्रभाग क्रमांक तीन मधील लोकसंख्या 35 ते 40 हजार असल्याने सध्या सुरू असलेल्या मुकुंद नगर मधील आरोग्य केंद्रा समोर मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन येथे लसीचा प्रमाणही कमी असल्याने  तसेच नागरिकांना रोज हेलपाटे मारावे लागत असल्याने येथे केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली या गोष्टीचा विचार करून अहमदनगर सोशल असोसिएशन अहमदनगर संचलित डॉ.जाकिर हुसेन मराठी प्राथमिक शाळा मुकुंद नगर येथे  केंद्र सुरू करण्यासाठी विनंती केली असता संस्थेने त्यासाठी संमतीपत्र दिलेले आहे तरी सदर ठिकाणी लसीकरण केंद्र व आरएटी व आरटीपीसीआर टेस्ट केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली व महानगर पालिकेने त्यासाठी नर्सेस ही उपलब्ध करून द्याव्यात व त्या ठिकाणी लागणारी सर्व व्यवस्था आम्ही करू अशी मागणी नगरसेवक असिफ सुलतान यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

No comments:

Post a Comment