आमदार, आयुक्त, पोलीस अधिक्षकांकडून कौतुक. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 26, 2021

आमदार, आयुक्त, पोलीस अधिक्षकांकडून कौतुक.

 आमदार, आयुक्त, पोलीस अधिक्षकांकडून कौतुक.

घर घर लंगरसेवेकडुन 5 लाख भोजन पाकिटांचे वितरण.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना व टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर मागील पंधरा महिन्यांपासून गोर-गरीब गरजू घटकांसह कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची भूक भागविणार्‍या घर घर लंगरसेवेच्या वतीने तब्बल 5 लाख जेवणाचे पाकिट वितरित करण्याचा टप्पा पार पडला. लंगर सेवेने जेवणाचे 5 लाख पाकिट वितरण केले असता, हॉटेल अशोका येथे लंगर बनविण्याच्या ठिकाणी आमदार संग्राम जगताप, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, आयुक्त शंकर गोरे, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, नगरसेवक गणेश भोसले यांनी भेट देऊन सेवादारांचे कौतुक केले.
मागील पंधरा महिन्यापासून हजारो गरजूंनी लंगर सेवेचा लाभ घेतला आहे. तसेच गरजूंना इतर सुविधा देखील पुरविण्याचे काम लंगर सेवेने केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने याही वर्षी टाळेबंदी करण्यात आल्याने लंगर सेवेने अविरतपणे ही सेवा सुरु ठेवली आहे. नुकतेच सोमवार (दि.24 मे) रोजी 5 लाख जेवणाचे पाकिट वितरणाचा टप्पा पार पडला. लंगर सेवेच्या सेवादारांबरोबर स्वत: आमदार संग्राम जगताप यांनी मशीनद्वारे पोळ्या बनविल्या. तसेच उपस्थित पाहुण्यांनी जेवणाचे पाकिट तयार केले.
याप्रसंगी हरजितसिंह वधवा म्हणाले की मागील वर्षापासून घर घर लंगर सेवा गरजूंना दोन वेळचे जेवण पुरवित आहे. टाळेबंदीत कोणी उपाशी राहू नये या भावनेने लंगरसेवेच्या सेवादारांनी गंभीर परिस्थितीमध्ये कोवीड सेंटर तसेच शहरातील गरजू घटकांना जेवण पुरविले आहे .  आमदार संग्राम जगताप म्हणाले की, निस्वार्थ भावनेची सेवा म्हणजेच शहरातील लंगर सेवा, ही सेवा मागील वर्षापासून सुरु आहे. अनेक गरजू घटकांची भूक भागविण्याचे काम लंगरसेवेने केले. सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असताना लंगरसेवेने त्यांना मोठा आधार दिला असल्याचे सांगितले. तसेच उपस्थितांनी या लंगर सेवेचे कौतुक केले. यावेळी लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, जनक आहुजा, प्रितपालसिंग धुप्पड, राहुल बजाज, किशोर मुनोत, जय रंगलानी, मनोज मदान, सतीश गंभीर, राजा नारंग, करण धुप्पड, राहुल शर्मा, नारायण अरोरा, अर्जुन मदान, सुनील थोरात, सुरज तोरणे, पुरुषोत्तम बेट्टी, शरद बेरड, प्रमोद पंतम, राजबीरसिंग संधू, संदेश रपारीया, प्रशांत मुनोत, सिमर वधवा, कैलाश नवलानी, राजवंश धुप्पड, मन्नू कुकरेजा, टोनी कुकरेजा, गोविंद खुराणा, सनी वधवा, राजेंद्र कंत्रोड, सुनिल छाजेड, आदित्य छाजेड, जतीन आहुजा, अनीश आहुजा, प्रशांत मुनोत, सागर मेहसुनी, सुनिल मुळे आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment