अहमदनगर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय जैव-विविधता दिवस साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 25, 2021

अहमदनगर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय जैव-विविधता दिवस साजरा

 अहमदनगर महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय जैव-विविधता दिवस साजरा

विविध विद्यापीठांमधील 1535 जणांचा सहभाग

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः अहमदनगर महाविद्यालयात दिनांक 22 मे, आंतरराष्ट्रीय जैव-विविधता दिवस ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ रजनीश बार्नबस यांच्या प्रेरणेतून विज्ञान मंच कडून  जैव-विविधता विषयक जाणीव जागृती मंजुषाचे आयोजन करण्यात आले होते. ऑनलाईन पद्धतीने या जाणीव मंजुषेचे आयोजन करण्यात आले होते.
युनेस्कोने 22 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय जैव-विविधता दिवस म्हणून साजरा करावा असे घोषित केले. पृथ्वीवरील थक्क करणार्‍या जैवविविधता विषयक योग्य माहितीचा प्रसार करणे. विविधतेचे संरक्षण करणे विषयी जागृती करणे या विचारातून हा दिवस साजरा करण्यात येतो. जैव-विविधतेचे महत्व लक्षात घेऊन भारत सरकारने 2002 मध्ये कायदा बनविला तर महाराष्ट्रात 2008 पासून जैवविविधता विषयक नियम लागू आहेत. या दिवसाचे औचित्य लक्षात घेऊन विविध संस्थांकडून अनेक प्रकारचे उपक्रम राबविले जातात.
तरुणाई मध्ये जैव-विविधता विषयक जाणीव जागृती व्हावी हा उद्देश ठेऊन अहमदनगर महाविद्यालयातील विज्ञान मंचने जाणीव जागृती मंजुषाचे आयोजन केले होते. विज्ञान मंचचे समन्वयक डॉ अभिजित कुलकर्णी आणि सदस्य यांनी प्रश्न मंजुषाचे आयोजन केले. या प्रश्न मंजुषा उपक्रमात 12 विद्यापीठे अंतर्गत 150 हून अधिक महाविद्यालयातील 1535 विद्यार्थी/प्राध्यापक यांनी सहभाग नोंदविला. या उपक्रमाचा भाग म्हणून सहभागींना जैव विविधता विषयी माहिती पी.डी.एफ. स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहे. या पी.डी.एफ. स्वरूपात वाचन साहित्याचे संकलन प्रा. प्रशांत कटके यांनी केले आहे. तांत्रिक सहयोग साई सुरम यांनी दिला.  
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकारिता महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब गायकर, डॉ. अरविंद नागवडे, डॉ. रझाक सय्यद, रजिस्ट्रार श्री दीपक अल्हाट आणि आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. प्रीतमकुमार बेदरकर यांचा सहयोग लाभला.

No comments:

Post a Comment