दुसर्‍या डोससाठी रुईछत्तीसीकरांनी अवलंबला अनोखा फंडा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 10, 2021

दुसर्‍या डोससाठी रुईछत्तीसीकरांनी अवलंबला अनोखा फंडा

 दुसर्‍या डोससाठी रुईछत्तीसीकरांनी अवलंबला अनोखा फंडा

गावातील ज्येष्ठांचे लसीकरण होणार ऑनलाईन


अहमदनगर :
नगर तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर कमालीची गर्दी वाढू लागली आहे. वाढलेली गर्दी कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ नये तसेच ज्यांनी लसीचा पाहिला डोस घेतला परंतु गर्दीमुळे दुसरा डोस मिळणे दुरापस्त झाले आहे अशा लोकांसाठी रुई छत्तीसी (ता. नगर ) येथे गावातील नागरिकांच्या लसीकरणासाठी ऑनलाईन -ऑफलाईन नोंदणीचा अनोखा फंडा अवलंबला आहे.
यासाठी माजी उपसभापती रवींद्र भापकर यांच्या पुढाकारातून व विजय खाकाळ यांच्या संकल्पनेतून गावातील जेष्ठ नागरिकांच्या दुसर्‍या डोस साठी स्वतंत्र ऍप बनववण्यात आले. याद्वारे ऑनलाईन नोंदणीची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. लोकांना यामुळे आता रांगेत उभा राहाण्याची गरज नसून घरीच आपल्या नावाची नोंदणी करता येणार आहे.याबरोबरच ज्यांना शक्य नाही अशा लोकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र रुईछत्तीसी येथे ऑफलाइन सुविधाही उपलब्ध केली आहे. यामध्ये एका बॉक्स मध्ये लाभार्थ्यांनी आपले नाव, पाहिला डोस तारीख, मोबाईल नंबर आदींची नोंद असलेली चिट्ठी जमा करायची आहे. त्यामुळे ज्यांच्या नावांची नोंद झाली अशा लोकांनाच लसी साठी बोलावले जाणार आहे. या अनोख्या फंड्यामुळे लसीकरण केंद्रावरील गर्दी व गोंधळ टळणार आहे. रुई छत्तीसी येथील नागरिकांचा या पद्धतीला चांगला प्रतिसाद मिळाला असून अत्ता पर्यंत 70 पेक्षा जास्त नागरिकांनी ऑनलाईन नाव नोंदणी केली आहे.
दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाल्यामुळे लस घेण्यासाठी लोकांनी रांगा लावायला सुरुवात केली. परिणामी प्रचंड गर्दी होत असल्याचे चित्र दिसू लागले. तसेच पाहिला डोस घेतलेल्या लोकांनाही दीड दोन महिने उलटूनही दुसरा डोस मिळणे दुरापस्त झाले. आशा लोकांसाठी ही पद्धती उपयुक्त ठरणार असून मोठया प्रमाणात होणारी गर्दी टळून नागरिकांचे सुयोग्य पद्धतीने लसीकरण होणार आहे.
रुई छत्तीसी गावात पाहिला डोस बहुतांश संख्येने घेण्यात आला. यानंतर लसीच्या तुडवढ्यामुळे गर्दी होऊ लागली. आता मात्र ऑनलाईन नोंदणी मुळे जेव्हड्यांची नोंद झाली फक्त त्यानाच लसी साठी बोलवले जाणार आहे. त्यामुळे गर्दी टळणार असून नागरिकांना दुसरा डोस वेळेत मिळणार आहे. हीच पद्धत 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी अवलंबिण्याचा मानस आहे. - रवींद्र भापकर, माजी उपसभापती

No comments:

Post a Comment