कोरोना काळात कर्तव्यात कसूर : दोन शिक्षकांवर कारवाई - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 19, 2021

कोरोना काळात कर्तव्यात कसूर : दोन शिक्षकांवर कारवाई

 कोरोना काळात कर्तव्यात कसूर : दोन शिक्षकांवर कारवाई

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोना काळात कर्तव्यात कसुर करणार्‍या  दोन शिक्षकावर कारवाई करण्यात आली आहे. तहसील विभागातर्फे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहे. जि. प. प्राथमिक शाळा आठवड येथील सहा. शिक्षक राजेंद्र ढगे, व जि. प. प्राथमिक शाळा मांडवे येथील सहा. शिक्षक शरद म्हस्के यांना करणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागितला आहे. तालुक्यातली ही पहिलीच  कार्यवाही आहे.
अहमदनगर तालुक्यात मोठया प्रमाणावर कोरोना प्रादुर्भाव वाढत असून प्रशासनाकडून प्राथमिक शिक्षकांच्या नेमणूका करण्यात आल्या आहेत. गावातील विलगीकरण कक्षात रुग्णांच्या नोंदी ठेवणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, कोवीड सेंटर व लसीकरण केंद्र आदी ठिकाणी शिक्षकांच्या नेमणूका करण्यात आलेल्या आहेत. प्राथमिक शिक्षकांकडून कोरोना काळात मोलाचे योगदान मिळत आहे. आरोग्य, महसुल, पोलीस यंत्रणा सोबत ग्रामस्तरावर तलाठी, ग्रामसेवक यांच्या सोबत प्राथमिक शिक्षक मोलाची भुमिका बजावत आहेत.
तथापी ग्रामस्तरावर काही लोक कोरोना काळात नेमणूक दिलेल्या कर्तव्याकडे जाणूनबुजून पाठ फिरवत आहेत. तालुका प्रशासनाकडून कर्तव्यात कसूर करण्यार्‍या व हलगर्जीपणा करण्यार्‍या कर्मचार्‍यांवर  कडक कारवाईचा बडगा उगरण्यात आला आहे. यापुढे कर्मचार्‍यांची गय केली जाणार नसून सर्व कर्मचार्‍यांनी एकजुटीने प्रयत्न करून आपला तालुका लवकरात लवकर कोरोना मुक्त करावा असे आवाहन तहसिलदार  उमेश पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment