म्यूकर मायक्रोसिस रुग्णांना शहरी गरीब कल्याण योजनेतून उपचार करण्याची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 25, 2021

म्यूकर मायक्रोसिस रुग्णांना शहरी गरीब कल्याण योजनेतून उपचार करण्याची मागणी

 म्यूकर मायक्रोसिस रुग्णांना शहरी गरीब कल्याण योजनेतून उपचार करण्याची मागणी

‘फुले ब्रिगेड’च्या वतीने आयुक्तांना निवेदन

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कोरोना विषाणू आजारातून बरे झाल्यानंतर पेशंटला म्यूकर मायक्रोसिस आजाराचे रुग्ण आढळत आहे त्यामुळे अहमदनगर महानगरपालिकेने शहरी गरीब कल्याण योजना सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन आयुक्त शंकर गोरे यांना देताना फुले ब्रिगेडचे शहर अध्यक्ष दिपक खेडकर समवेत महेश सुडके, आकाश डागवाले, प्रसाद शिंदे, किरण जावळे, गणेश अडब्बले, संकेत लोंढे, आशिष भगत आदी उपस्थित होते.
उप
चार महागडे असल्या कारणाने त्यावरील खर्च सर्वसामान्य नागरिकांना पेलत नाही. या कोरोना महामारी मध्ये लॉकडाउनमुळे नागरिकांच्या हाताला काम नाही या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर शहरी गरीब कल्याण योजना सुरू करुण म्यूकर मायक्रोसिस या आजाराचा या योजनेमध्ये समावेश करावा आणि या योजनेच्या माध्यमातून एक ते दोन लाखापर्यंत आर्थिक सहाय्य अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून रुग्णांना दिले जावे जेणेकरून रुग्णांची पैसे अभावी होणारी हेळसांड थांबून दिलासा मिळणार असल्याची मागणी फुले ब्रिगेडच्या वतीने आयुक्तांना करण्यात आली
.

No comments:

Post a Comment