शस्त्राचा धाक दाखवून लुटमार करणारी टोळी जेरबंद - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 19, 2021

शस्त्राचा धाक दाखवून लुटमार करणारी टोळी जेरबंद

 शस्त्राचा धाक दाखवून लुटमार करणारी टोळी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः 10 मे रोजी 04.20 वा. सुमारास शेंडी शिवार, बायपास चौफुला, नगर औरंगाबाद रोड येथे फिर्यादी अनिकेत सुधाकर सावंत (वय 27 वर्ष, धंदा ड्रायव्हर, रा. वडगांव मावळ, जिल्हा पुणे)त्यांचे स्वतःचे टेम्पोसह थांबले असताना एका विनानंबरचे मोटार सायलकवरुन आलेल्या तिन अज्ञात चोरटयानी फिर्यादीचे टेम्पोचा दरवाजा उघडुन त्यांना कोयत्याचा धाक दाखवुन फिर्यादीचे खिश्यातील रोख रक्कम 1500/- रु. व कादगपत्र बळजबरीने चोरुन नेले होते त्याबाबत फियांदी यांनी एमआयडीसी पो.स्टे येथे दिलेल्या फिर्याद वरुन गु.र.नं. 290 / 2021 भादवी कलम 392, 397, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरचा गुन्हा दाखल झाले नंतर तसेच त्यापुर्वी व त्यानंतरही सतत अश्या प्रकाराचे गुन्हे घडत असल्याने त्याचे गांभीर्य ओळखुन मा. पोलीस अधीक्षक साहेब, श्री मनोज पाटील यांनी पो. नि. श्री. अनिल कटके यांना सदरचा गुन्हा उघडकीस आनण्यासाठी एक स्वतंत्र पथकाची नेमणुक करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पो. नि. श्री. अनिल कटके यांनी सपोनि / सोमनाथ दिवटे, सपोनि / मिथुन घुगे, पोसई श्री गणेश इंगळे, सफी / मन्सुर सय्यद, पोना / संदिप पवार, पोना/ सुरेश माळी, पोना/ विशाल दळवी, रवि सोनटक्के, पोकॉ/ सागर ससाणे, मच्छिद्र बर्डे, शिवाजी ढाकणे, रोहीत येमुल, रंनजीत जाधव, योगेश सातपुते, चापोहेकॉ/ संभाजी कोतकर यांचे एक स्वतंत्र पथक स्थापन केले होते. सदर पथक हे मागील काही दिवसापासुन रोज रात्री शेडी शिवारातील बायपास चौफुला येथे एक मालवाहु टेम्पो रस्त्याचे कडेला थांबवून सापळा लावत होते. त्यादरम्यान दिनांक 18/05/2021 रोजीचे पहाटे 4.00 वा. सुमा, स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अमंलदार हे शेडी बायपास चौफुला येथे सापळा लावून थांबलेले असतांना एका काळे रंगाचे विना नंबरचे आपाची मोटार सायकल वरुन तिन चोरटे टेम्पो जवळ आले व त्यातील एक इसम मोटार सायकल वर थांबुन दोघांनी टेम्पोचा दरवाजा उघडुन टेम्पो चालकाचे गळयास कोयता लावुन पैशाची मागणी करीत असतांना पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी त्यांना पकडण्यासाठी अचानक झडप घातली त्यावेळी एक चोरटा अंधाराचा फायदा पळुन गेला. पकडलेल्या दोन्ही चोरटयांना पथकातील अधिकारी व अमंलदार यांची ओळख सांगुन त्यांना त्याचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नावे (1) स्वप्नील उर्फ आदित्य अशोक पाखरे वय 25 रा. नागरदेवळे ता. जि. अहमदनगर (2) किशोर उर्फ ईश्वर दिलीप शिंदे वय 24 रा. देहरे ता. जि. अहमदनगर असे असल्याचे सांगीतले तसेच पळुन गेलेल्या साथीदारा बाबत त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांनी त्याचे नाव (3) आकाश पांडुरंग शिंदे रा. विळद ता. जि. अहमदनगर असे असल्याचे सांगीतले. त्यांनतर ताब्यात घेतलेल्या आरोपीची अंगझडती घेतली असता त्यांचे अंगझडती व कब्जामधुन 300/- रु. किंमतीची लोखंडी कत्ती, एक गिलवर तसेच गुन्हयात वापरलेली 55,000/- रु. किमतीची टीव्हीएस कंपनीची आपाची मोटार सायकल मिळुन आल्याने ते जागीच जप्त करण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे वरील नमुद गुन्हया बाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे साथीदार नामे आकाश पांडुरंग शिंदे, महेश शिंदे, गणेश शिंदे व सागर शिंदे सर्व रा. विळद, ता. जि. अ. नगर अशांनी मिळुन केला असल्याची माहिती दिल्याने सदर माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेवुन आरोपी नामे (3) महेश मनाजी उर्फ मनोहर शिंदे वय 28 रा. विळद, ता.जि.अ.नगर यास विळद येथुन ताब्यात घेतले. आरोपी आकाश पांडुरंग शिंदे व गणेश शिंदे व सागर शिंद यांचा शोध घेतला पंरतु ते मिळुन आले नाहीत.

No comments:

Post a Comment