माजी उपनगराध्यक्ष रावसाहेब बोरुडे यांचे निधन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, May 26, 2021

माजी उपनगराध्यक्ष रावसाहेब बोरुडे यांचे निधन

 माजी उपनगराध्यक्ष रावसाहेब बोरुडे यांचे निधन


अहमदनगर ः
हॉटेल विजय, हॉटेल पुष्कराज, हॉटेल परिचय, हॉटेल इंपीरियल अशी दर्जेदार 12 हॉटेल नगर शहरात उभारणारे हॉटेल उद्योग समूहाचे संस्थापक रावसाहेब बोरुडे यांचे वयाच्या 80 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांचे पाठीमागे पत्नी, 2 मुले, 2 मुली, नातवंडे बंधू भावजयी असा परिवार आहे. जूनी एस एस सी मुळे बोरुडे यांनी काही काळ पोलिस खात्यात हवालदार म्हणून नोकरी केली. परंतु नगरशहर स्वतः शेती शहरालगत नोकरीत मन रमेना म्हणुन त्यांनी उद्योग व्यवसाय करावा असे सातत्याने मनात येत होते. 7 भाऊ, भावजयी यांची उत्तम साथ होती. त्यामुळेच त्यांनी नगर शहरात प्रथम हॉटेल सुरु करुन उत्तम गुणवत्ता आणि सर्व्हिस दिली. ती लोकांना खुप आवडली. त्यातून त्यांनी एकापाठी मागे एक असे 12 हॉटेल आज नगर शहरात उत्तम उभारलेले आहे. त्यांनी हा व्यवसास करत असताना सामाजिक कार्यात ही अग्रेसर राहिले. माजी उपमहापौर अनिल भाऊ बोरुडे यांचे ते चुलते होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here