चिचोंडी येथील कोविड सेंटरला प्राथमिक शिक्षकांची मदत - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, May 20, 2021

चिचोंडी येथील कोविड सेंटरला प्राथमिक शिक्षकांची मदत

 चिचोंडी येथील कोविड सेंटरला प्राथमिक शिक्षकांची मदत


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः सामाजिक बांधिलकी समजून पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथील आनंद कोव्हीड सेंटर व शिवनेरी कोव्हीड सेंटर यांना चिचोंडी केंद्रातील  प्राथमिक शिक्षकांच्या वतीने कोरोना रुग्णांसाठी सत्तावीस एप्रिल रोजी पुढील प्रमाणे  वस्तू भेट दिल्या.
200 बॉक्स बिसलरी , 240 किलो पोहे, 100 किलो शेंगदाणे , 120 किलो रवा,100 किलो साखर, चार मोठे तेल डबे , पाच मोठे बिस्किटे बॉक्स , पाच लिटर चे दहा सॅनिटायझर ड्रम  ,वाफ घेण्याच्या 14  मशीन ,1500 मास्क,1200पत्रावळी  अशा अनेक वस्तू  या शिक्षकांनी या दोन कोव्हीड केंद्राचे चालक मा .सरपंच एकनाथ आटकर, मा सभापती संभाजी पालवे व भरत पालवे ,सदस्य संदिप दानवे ,प्रकाश तिवारी ,प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी ,परिचारिका , यांच्याकडे पाथर्डी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अभयकुमार वाव्हळ ,केंद्रप्रमुख बाळासाहेब दळवी  ,उपक्रमशील शिक्षक विजय अकोलकर , उपक्रमशील शिक्षक तुकाराम अडसूळ ,सुनील शिंदे ,विजय नरवडे ,महादेव शिंदे ,भगवान फसले ,रघुनाथ आंधळे , ऋषिकेश एकशिंगे , भगवान पालवे ,संदीप आंधळे ,संदीप अकोलकर यांनी परिश्रम घेऊन  हे सर्व साहित्य    सुपूर्द केले.
ज्या-ज्या वेळी समाजात संकट येते त्या त्या वेळी शिक्षक  समाजाच्या मदतीसाठी धावून येतात. या  कोव्हीड सेंटरला केलेल्या मदतीबद्दल म्हणजे या सामाजिक कार्याबद्दल या कोव्हीड सेंटरचे चालक एकनाथ आटकर ,माजी सभापती संभाजी पालवे आणि परिसरातील नागरिकांनी या सर्व  शिक्षकांचे विशेष अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment