त्या अपात्र घोषित शाळांचे त्रुटीपूर्ततेचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढून निधी देण्याची मागणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 21, 2021

त्या अपात्र घोषित शाळांचे त्रुटीपूर्ततेचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढून निधी देण्याची मागणी

 त्या अपात्र घोषित शाळांचे त्रुटीपूर्ततेचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढून निधी देण्याची मागणी

शिक्षक परिषदेच्यावतीने शालेय शिक्षण मंत्री व शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिवांना निवेदन


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः 12 व 15 फेब्रुवारीच्या शासन निर्णयान्वये अपात्र घोषित केलेल्या शाळांचे त्रुटीपूर्ततेचे प्रस्ताव तात्काळ निकाली काढून, अनुदानासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष तथा शिक्षक आमदार नागो गाणार यांनी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड व शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना पाठविले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
12 व 15 फेब्रुवारीच्या शासन निर्णय अन्वये बिंदूनामावली व शैक्षणिक सत्र 2018-2019 मधील शेवटच्या वर्गातील विद्यार्थी संख्या तसेच अन्य त्रुट्यांच्या पूर्ततेसाठी शाळांना अनुदानासाठी अपात्र घोषित केले. संबंधित शाळांनी निर्देशित केलेल्या त्रुटींची पूर्तता करून शासनाकडे प्रस्ताव सादर केले. शासनाने या प्रस्तावांची छाननी व तपासणी सुद्धा केली. परंतु छाननी व तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या शाळांची यादी घोषित केली नाही. तसेच छाननी व तपासणी मध्ये पात्र ठरलेल्या शाळांची विभागस्तरावर तपासणी करण्याचे घोषित केले. त्याबाबतचे वेळापत्रक जाहीर केले. परंतु कोरोना संकटाच्या कारणामुळे विभागस्तरावरील तपासणी तहकूब केली. त्यामुळे या प्रकरणाबाबत अनिश्चितता निर्माण होऊन संबंधित शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण झाला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. तर आमदार गाणार यांनी सदर प्रश्नी 14 मे रोजी पत्र देऊन देखील त्याची दखल न घेतल्याने खेद व्यक्त केला आहे.
अपात्र घोषित केलेल्या बहुतेक शाळांनी त्रुटींची पूर्तता केली आहे. याबाबतची सत्यता सादर केलेल्या त्रुटीपूर्तता प्रस्तावाचे आधारे तपासली जाऊ शकते. त्यामुळे त्रुटीपूर्ततेचे बहुतेक सर्व प्रस्ताव छाननी व तपासणीद्वारे तात्काळ निकाली काढले जाऊ शकतात. फक्त अपवादात्मक उर्वरित प्रस्ताव निकाली काढण्यासाठी विभागस्तरावर तपासणी आयोजित करून सर्व प्रस्ताव निकाली काढण्याचे शिक्षक परिषदेच्या वतीने सुचविण्यात आले असल्याचे बाबासाहेब बोडखे यांनी सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here