मनपाने कोरोनाग्रस्त पत्रकार व माध्यम प्रतिनिधींना औषधोपचार खर्च द्यावा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 21, 2021

मनपाने कोरोनाग्रस्त पत्रकार व माध्यम प्रतिनिधींना औषधोपचार खर्च द्यावा

 मनपाने कोरोनाग्रस्त पत्रकार व माध्यम प्रतिनिधींना औषधोपचार खर्च द्यावा

अभय ललवाणींची महापौर व आयुक्तांकडे मागणी

नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोना काळात सेवा देतांना शहरातील अनेक पत्रकार, वर्तमानपत्र व प्रसारमाध्यम कार्यालयांत कार्यरत कर्मचारी कोरोनाग्रस्त झालेले आहेत. अशा सर्व कोरोनाग्रस्त पत्रकार व माध्यम प्रतिनिधींना कोरोनावरील औषधोपचार खर्च महानगर पालिकेने द्यावा अशी मागणी महसूल मित्र मासिकाचे संपादक व दैनिक बिझनेस स्टॅण्डर्डचे प्रतिनीधी अभय ललवाणी यांनी महापौर बाबासाहेब वाकळे व आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, याबाबतचे निकष ठरविण्यासाठी समिती नेमण्यात यावी. अशा प्रकारचा निर्णय घेणारी अहमदनगर महानगरपालिका राज्यातील पहीलीच महानगरपालिका ठरु शकेल. याबाबतचे निवेदन आमदार संग्राम जगताप यांना देखील देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here