माताजीनगरला पाणी द्या ः अशोक बडे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 18, 2021

माताजीनगरला पाणी द्या ः अशोक बडे.

 माताजीनगरला पाणी द्या ः अशोक बडे.

शिवसेनेचे मनपा आयुक्तांना निवेदन...

नगरला रोज पिण्याचे पाणी देता येईल इतका पाणी साठा मूळा धरणात असतो पण अनेक ठिकाणी पाईपलाईनला गळती व यापूर्वीचा मनपातील अधिकारी, कर्मचारी यांचा ढसाळ कारभार नियोजन शून्य याला लोकप्रतिनिधी पण जबाबदार आहेत. - शंकर गोरे, आयुक्त मनपा.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नागापूर, बोल्हेगाव परिसरातील माताजी नगर ला पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याची टाकी आहे. महिन्यापूर्वी मनपाने नळ कनेक्शनही दिले आहेत. मुळा धरणात ही पाणी साठा उपलब्ध असताना पाणी का मिळू शकत नाही असा प्रश्न शिवसेना नगरसेवक अशोक बडे यांनी मनपा आयुक्तांना एका निवेदनाद्वारे उपस्थित केला आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात बडे यांनी म्हटले आहे की, प्रभाग सात मधील नागापूर- बोल्हेगाव परिसरात फेज-2 लाईनचे पाणी सुरु करा. तसेच मंजूर असलेली रस्त्यांची कामे लवकरात लवकर करावेत. परिसरात नालेसफाईचे काम तत्काळ सुरु करण्यात यावे.तसेच अतिशय गंभीर बाब म्हणजे माताजीनगरच्या पिण्याचा पाण्यासाठी टाकी तयार आहे मात्र पाणी नाही. मनपात पैसे भरून नळ कनेक्शन घेऊन एक महिना झाला तरीही त्या नागरिकांना टाकीतून पिण्याचे पाणी मिळत नाही जनतेला पाणी द्या. लवकरात लवकर या टाकीत पाणीपुरवठा करण्यात यावा. प्रभाग सात मधील नागापूर गाव,पितळे कॉलनी, आदर्शनगर, गुरुकृपा कॉलनी, ओंकार कॉलनी, साईश्रध्दा कॉलनी, अंकुर कॉलनी, व्यंकटेश कॉलनी, माताजीनगर, सोनाचाफा कॉलनी,रेणुकानगर,बालाजीनगर, संतराम नागरगोजे भवन जवळील परिसर, भारतनगर, गांधीनगर, बोल्हेगाव फाटा, भोर कॉलनी, विजयनगर, भंडारी कॉलनी,नम्रता हॉटेल परिसर,अक्षय कॉलनी,शुभम कॉलनी,गणेश पार्क, गणेश चौक परिसर, शिंदे कॉलनी, सौरभ कॉलनी, कातोरे वस्ती, राघवेंद्रस्वामी मंदिर परिसर, राजमाता कॉलनी अशा विविध भागात अवेळी पाणीपुरवठा होतो.त्यामुळे माता भगिनींची रात्री बेरात्री उठून पाणी भरावे लागते.सदर परिसरातील फेज-2 पाणी योजनेचे काम पूर्ण झाले असून पिण्याचा पानाच्या लाईनचे टेस्टिंग सुद्धा झालेले आहे. पाण्याचा टाकीचे साफसफाईचे काम हि झालेले आहे.तरी वरीलपैकी माताजीनगर या भागातील नागरिकांनी मनपा कडे पैसे भरून नळ कनेक्शन घेऊन एक महिना झाला तरीही त्या नागरिकांना टाकीतून पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे माताजीनगर या भागात पूर्ण दाबाने वेळेवर पाणी देण्याचे आदेश संबंधित विभागास द्यावेत.फेज-2 पाणी योजनेचे पाणी वाटप टाकीतून सुरु करावे. सोनुले घर ते बल्लाळ घर, बल्लाळ घर ते वाघ घरापर्यंत. गुरुकृपा कॉलनी अंतर्गत रस्ता, ओंकार कॉलनी अंतर्गत रस्ता.नम्रता हॉटेल ते सूळ घर, सुळ घर ते कौस्तुभ ज्वेलर्स पर्यंतचारस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याचे मंजूर असूनही सदर ठेकेदाराणे काम पूर्ण केले नाही,तरी त्या कामाचे रिटेंडरिंग करून दुसर्‍या ठेकेदाराकडून लवकरात लवकर सदरील कामे पूर्ण करून घ्यावेत. तसेच प्रभागातील नागापूर- बोल्हेगाव परिसरातील ओढे-नाले, तुंबलेल्या गटारी कॉलनितील अंतर्गत ड्रेनेजलाईन साफसफाई करण्याचे आदेश पावसाळा चालू होण्यापूर्वी संबंधित विभागास देण्यात यावा. असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी दत्ता सप्रे,शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, भागचंद भाकरे, परेश लोखंडे, दत्ता जाधव,विशाल वालकर, भैय्या साठे,अविनाश गायकवाड उपस्थित होते.

No comments:

Post a Comment