शिक्षक बँक घड्याळ घोटाळ्याची चौकशी करावी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, May 26, 2021

शिक्षक बँक घड्याळ घोटाळ्याची चौकशी करावी

 शिक्षक बँक घड्याळ घोटाळ्याची चौकशी करावी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः : जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या मागील दीड वर्षापासून घड्याळ खरेदी व्यवहारातील भ्रष्टाचार गाजत आहे. याची चौकशी व्हावी याकरिता जिल्हा उपनिबधकांकडे सातत्याने मागणी होत आहे. त्याअनुषंगाने प्राथमिक शिक्षक बँकेतील घड्याळ घोटाळ्याची कलम 83 अंतर्गत चौकशीचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले. जागृत सभासदांच्या तक्रारीवरून जिल्हा उपनिबंधकांनी शिक्षक बँकेच्या घड्याळ व्यवहाराच्या चौकशीकरिता श्रीगोंदा येथील सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती.
घड्याळ खरेदी व्यवहार अनियमितता आणि अपहारची चौकशी प्रक्रिया पूर्ण करून नुकताच अंतिम चौकशी अहवाल जिल्हा उपनिबंधकांना सादर केला होता. या चौकशी अहवालात घड्याळ घोटाळा व्यवहारातील अनियमिततेवर चौकशीमध्ये ठपका ठेवत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 83 अंतर्गत चौकशी करण्याबाबत शिफारस केली होती.
या अनुषंगाने अखेर जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दोन महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक चौकशी अहवालात 14 लाख 1600 रुपयांचे आर्थिक नुकसान बँकेच्या सत्ताधारी संचालक मंडळाने केलेले आहे, असे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. ही रक्कम मोठी असल्यामुळे बँकेची कलम 83 अंतर्गत चौकशी करून जबाबदार संचालक मंडळाकडून वसूली करण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाही दुय्यम निबंधक कार्यालयाकडून करण्यात आली आहे. पुढील चौकशीसाठी श्रीराम वाघ यांची सक्षम प्राधिकृत चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली असल्याची माहिती गुरुमाऊली मंडळाचे प्रवीण ठुबे, विकास डावखरे, गणेश वाघ, संतोष खामकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment