म. फुले जनआरोग्य योजनेद्वारा, कोरोना उपचाराचे पैसे मिळवुन देणार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, May 22, 2021

म. फुले जनआरोग्य योजनेद्वारा, कोरोना उपचाराचे पैसे मिळवुन देणार.

 म. फुले जनआरोग्य योजनेद्वारा, कोरोना उपचाराचे पैसे मिळवुन देणार.

मनसेची मोहीम, शहरातील हॉस्पीटल रडारवर..


अहमदनगर -
महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून कोरोना अजारावर उपचार घेतलेल्या रुग्णांना भरलेली बिले पैसे हे मनसे परत मिळवून देणार आहे.नगर शहारातील आठ हॉस्पिटल मध्ये उपचार घेतलेल्या रुग्णांना हि बिले परत मिळतील. त्या करिता त्यांनी एक अर्ज भरून उपचार घेतलेल्या हॉस्पिटल मधील महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील काम करणार्‍या आरोग्य मित्रांकडे अर्ज जमा करावा. तसेच अर्जासोबत हॉस्पिटल, लॅब, मेडिकल, सिटी स्कॅन, एमआरआय बिले तसेच आधार कार्ड,केशरी, पिवळे, पांढरे, शुभ्र रेशनकार्ड च्या झेरॉक्स प्रत जोडावी सर्व बिले जोडावित. उपचाादरम्यान ऑक्सीजन लेवल हि 94 पेक्षा कमी अश्या रुग्णांनी अर्ज करावा असेही भुतारे यांनी म्हटले आहे. अर्ज जमा करतांना आपली हॉस्पिटलच्या माध्यमातुन काही कारणे सांगून दिशाभूल केली जाऊ शकते त्यामुळे आपण अर्ज जमा करावा व त्याची अर्जाची झेरॉक्स प्रत वर पोहच घ्यावी व त्याची एक प्रत आमच्याकडे जमा करावी रुग्ण जर बाहेर गावी राहत असेल तर त्यांनी त्यांच्या अर्जाची पोहोच प्रत त्या तालुक्यातील मनसेच्या जिल्हाध्यक्ष,तालुका अध्यक्ष यांच्याकडे जमा कराव्यात. अधिक माहिती साठी 730461221 या नंबर वर संपर्क साधावा. असे आवाहन मनसेच्या वतीने नितीन भुतारे यांनी केले आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या मोहिमेमुळे सर्वसामान्य जनतेचा नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्हा तसेच शहरातील डॉक्टर तसेच हॉस्पिटल मालकांनी चांगलाच धसका घेतला आहे.शहारातील जनतेच्या मागे मनसे उभी राहिल्या मुळे मनसेच्या नितीन भुतारे यांच्या कामाची चर्चा जिल्हयात व शहरात जोर धरत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here