पोलिसांबद्दल कृतज्ञता, ‘आय लव्ह नगर’तर्फे मास्क
नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चोवीस तास कर्तव्यावर असलेल्या अहमदनगर पोलिसांना ‘आय लव्ह नगर’तर्फे दर्जेदार असे ईयुएमई (एणचए) कंपनीचे एन-95 मास्क देण्यात आले. शनिवारी (दि.22) पोलिस अधीक्षक मनोज पाटील, ’आय लव्ह नगर’चे संस्थापक नरेंद्र फिरोदिया यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उपक्रम पार पडला.
कोरोनाच्या दुसर्या लाटेने सर्वत्र थैमान घातले आहे. याकाळात पोलिस दिवस-रात्र आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. एखाद्या ठिकाणी गर्दी होणार नाही, विनाकारण रस्त्यावर कोणी फिरणार नाही, यासाठी पोलिस विशेष खबरदारी घेत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी चोवीस तास कर्तव्यावर असणार्या या पोलिस अधिकारी व कर्मचार्यांचे कोरोनापासून संरक्षण व्हावे, या उद्देशाने ‘आय लव्ह नगर’तर्फे त्यांना एन-95 मास्कचे वाटप करण्यात आले. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. तर, आय लव्ह नगरचे संस्थापक नरेंद्र फिरोदिया म्हणाले, ’कोरोना काळात स्वतःचा बचाव करण्यासाठी मास्क ही ढाल समजली जाते. त्यामुळेच पोलिसांचे कोरोनापासून संरक्षण व्हावे, तसेच पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना मास्क देण्याचा उपक्रम राबवला आहे.’ या कार्यक्रमाला अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, नगर शहर पोलिस उपविभागीय अधिकारी विशाल ढूमे, ’आय लव्ह नगर’चे विशाखा पितळे, कार्तिक नायर आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment