सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र नोंदणी गुरुवारी 27 मे रोजी पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते लोकार्पण - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, May 25, 2021

सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र नोंदणी गुरुवारी 27 मे रोजी पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते लोकार्पण

 सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र नोंदणी गुरुवारी 27 मे रोजी पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते लोकार्पण

अहमदनगर जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी दिली माहिती


मुंबई ः
महाराष्ट्र राज्यातील सर्व सरपंच यांसाठी आणि पंचायत राज व्यवस्थेमधील शेवटच्या घटकातील ग्रामविकासासाठी काम करणार्‍या सरपंच परिषद मुंबई,महाराष्ट्र च्या सरपंच पचे लोकार्पण ज्याच्यामुळे राज्यातील नव्हे देशातील सरपंच पदामुळे मान, सन्मान आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्याचाही गौरव संपूर्ण देशामध्ये झाला. असे आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच तथा आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटरावजी पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे. अशी माहिती सरपंच परिषदेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष, व लोकनियुक्त सरपंच हिंगणगाव तालुका नगर श्री आबासाहेब सोनवणे यांनी दिली आहे.
गुरुवार दिनांक 27 मे 2021 रोजी ठीक दुपारी एक वाजता आदर्श गाव हिवरे बाजार येथे राज्यातील निवडक राज्य पदाधिकारी यांचे उपस्थितीत सध्याची र्लेींळव-19 ची परिस्थिती पाहता. कोरोनाचे सर्व नियम पाळून हा सरपंच प लोकार्पण सोहळा होणार आहे.हा लोकार्पण सोहळा फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून राज्यातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामीण विकासातील तज्ञ व्यक्ती, ग्राम विकासाची तळमळ असणारे ग्रामस्थ यांनाही सहभागी होता येणार आहे. अशी माहिती सरपंच परिषद अहमदनगर जिल्हाध्यक्ष श्री आबासाहेब सोनवणे यांनी दिली.या कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून राज्य सरपंच परिषदेचे अध्यक्ष मा.दत्ताभाऊ काकडे उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने फेसबुक लाईव्ह सहभागी होण्याचे आवाहन राज्याचे उपाध्यक्ष श्री अनिल गीते पाटील, प्रदेश सरचिटणीस ड. विकास जाधव, महिला प्रदेशाध्यक्ष राणीताई पाटील, उपाध्यक्ष अश्विनीताई थोरात, कोअर कमिटी प्रमुख अविनाश आव्हाड, राज्य कार्यकारिणी सदस्य राजू पोतनीस, शिवाजी आप्पा मोरे, किसन जाधव, पांडुरंग नागरगोजे, आनंद जाधव,सुधीर पठाडे, सुप्रिया जेधे, नारायण वनवे इत्यादी पदाधिकारी यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here