अभय आव्हाड प्रतिष्ठानकडून हंडाळवाडीत जंतुनाशक फवारणी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, May 19, 2021

अभय आव्हाड प्रतिष्ठानकडून हंडाळवाडीत जंतुनाशक फवारणी

 अभय आव्हाड प्रतिष्ठानकडून हंडाळवाडीत जंतुनाशक फवारणी


नगरी दवंडी/प्रतिनिधी
खरवंडी कासार ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून येथील अभय आव्हाड प्रतिष्ठानकडून संपूर्ण हंडाळवाडी गावात ट्रॅक्टरद्वारे जंतुनाशक फवारणी करण्यात आली. जंतुनाशक फवारणी मुळे कोरोनाला आळा बसण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून हंडाळवाडीत घरोघरी जाऊन आरोग्यतपासणी करण्यात आली. यावेळी प्राथमिक काळजी म्हणून प्रत्येक गावकर्‍याची ऑक्सिजन लेव्हल व तापमान चेक करण्यात आले तसेच प्रत्येकाला व्हिट्यामिन सी च्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. प्रतिष्ठान कडून वेळोवेळी आरोग्य तपासणी   व जंतुनाशक फवारणी करण्यात येणार असून या उपक्रमाचे हंडाळवाडी ग्रामस्थांनी स्वागत केले आहे. यावेळी डॉ. पांडुरंग हंडाळ, आसाराम ठोंबरे, प्रमोद हंडाळ, विठ्ठल धस, बाळासाहेब हंडाळ, रावसाहेब कराळे, बाळू हंडाळ आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here