आ.पवारांच्या कामाचा परिणाम मतदारसंघाला काही दिवसांनी जाणवेल ः धांडे
नगरी दवंडी/प्रिंतनिधी
कर्जत ः कोरोना महामारीच्या काळात आ रोहित पवार यांनी अत्यंत सक्षमपणे सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेऊन केलेल्या नियोजनामुळे तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून कोठेही विरोधकांना संधी उपलब्ध न झाल्याने सध्या सोशल मीडियामध्ये उलट सुलट चर्चेला उधाण आले असून हे अजीबात योग्य नाही, त्यामुळे चांगल्याल चांगले म्हटले पाहिजे असे मत सामाजिक कार्यकर्ते बळीराम धांडे यांनी व्यक्त केले.
आ रोहित पवार यांनी गेली दीड वर्षाच्या आपल्या कार्यकाळात तालुक्यात आपल्या कामाने वेगळी छाप पाडली असून कोरोना सारख्या अडचणींना तोंड देत सुरू असलेली कामे प्रकाशात येत नसल्याने एखादा छोटा मुद्दा धरून त्यावर विरोधक टीकेची झोड उठवत आहेत हे अत्यंत अयोग्य आहे, सध्या तालुक्यात विविध पातळ्यांवर पवार यांच्या सर्वच टीमकडून मोठे काम सुरू आहे, आ रोहित पवार हे सातत्याने कर्जत तालुक्यात अधिकार्यांच्या बैठका घेऊन कोरोनाबाबत नियोजन करत आहेत, सुरुवाती पासून त्यांनी यााबाबत विशेष लक्ष ठेवले दोन ठिकाणी कोव्हिडं केअर सेंटर उभारले, महिलांची स्वतंत्र व्यवस्था केली, ऑक्सिजनचा तुटवडा पडणार नाही याकडे लक्ष दिले, रुग्णावर उपचार करण्यासाठी शासकीय यंत्रणा कमी पडत असताना बारामती मधून डॉक्टर, नर्स उपलब्ध करून देत मोठा हातभार लावला, याशिवाय कर्जत येथेच ऑक्सिजन प्लांट उभा करण्याचे ही काम सुरू केले आहे, आ रोहित पवार स्वतः काम करत असताना त्याची यंत्रणा व कार्यकर्ते ही दिवस रात्र मेहनत घेत आहेत, अनेकांनी रक्तदान शिबिरे ही घेतली आहेत. आ रोहित पवार यांनी कुकडीच्या पाण्यासाठी विशेष लक्ष देऊन वरिष्ठ पातळीवर सतत सम्पर्क ठेवत पाणी सोडण्याचे यशस्वी काम केले व आज तालुक्यात पाणी आले आहे याकडे पाहण्या ऐवजी सध्या विरोधक टीका करण्यात धन्यता मानत आहेत, असे मत सामाजिक कार्यकर्ते बळीराम धांडे यांनी व्यक्त केले आहे. आ. रोहित पवार यांनी अनेक रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा केला, पानंद रस्ते याकडे विशेष लक्ष दिले आहे, कर्जत शहरात विविध महापुरुषांची चित्रे रेखाटून शहराला चांगले रूप देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत, तालुक्यातील विविध अधिकारी कसे चांगले येतील याकडे विशेष लक्ष दिल्याने आज तालुक्यातील अधिकार्या च्या चांगल्या कामाचे परिणाम जनतेला अनुभवण्यास मिळत आहेत.
No comments:
Post a Comment