गुंडेगावचे आराध्य दैवत भैरवनांथाची यात्रा रद्द - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, May 26, 2021

गुंडेगावचे आराध्य दैवत भैरवनांथाची यात्रा रद्द

 गुंडेगावचे आराध्य दैवत भैरवनांथाची यात्रा रद्द

नगरी दवंडी/प्रतिनिधी
गुंडेगाव ः यावर्षी 27 व 28 मे रोजी हा भैरवनाथ देवांची यात्रा  उत्सव होणार होता. कोरोनामुळे सलग दुसर्‍या वर्षीही यात्रा रद्द करावी लागली आहे.
गुंडेगाव  येथे यात्रा  उत्सव दरवर्षी बुद्धपौर्णिमेच्या दुसर्या दिवशी  मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवास गावातील  भाविकांची गर्दी असते. बाहेरगावी नोकरदार, व्यावसायिक यात्रोत्सवास हमखास हजेरी लावून ग्रामदैवताचे मनोभावे दर्शन घेतात. परंतु यावर्षीही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गावांमध्ये शांतता कमिटीची बैठक होऊन त्यामध्ये सदरील यात्रा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या शंभर वर्षात यात्रा रद्द होण्याची ही दुसरी वेळ असल्याने अनेक भाविकांच्या श्रद्धेवर विरजण पडले आहे. यंदा घरातूनच भैरवनाथ देवांचे दर्शन घेण्याचे आवाहन संरपच सौ मंगल संकट,  उपसरपंच संतोष भापकर , ग्रामपंचायत सदस्य, यात्रा उत्सव कमिटीने घेतला आसून जिल्हा अधिकारी याच्या नियमानुसार धार्मिक विधी  पुजा करण्यात येईल आसे मत भैरवनाथ  मंदिराचे पुजारी सुनील पवार,  उपसंरपच संतोष भापकर यांनी व्यक्त केले आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब हराळ,मा.संरपच  संजय कोतकर, सुनिल भापकर,  सतिश चौधरी, संतोष धावडे, राहुल चौधरी, भाऊसाहेब हराळ,  सा. कार्यकर्ते संतोष सकट, मा. उपसंरपच मंगेश हराळ, एकनाथ कासार, गोरख माने, भवानी प्रसाद चुंबळकर मेजर, श्यामराव कासार, संतोष कोतकर, प्रदीप भापकर , शेखर हराळ, तुकाराम भापकर,  सचिन जाधव, दादासाहेब आगळे, संदिप भापकर, पत्रकार संजय भापकर व यात्रा उत्सव कमिटीचे सदस्यांनी  सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here