रासायनिक खतांच्या किमती भडकल्या, शेतकर्यांवर पुन्हा कुर्हाड......
उत्पादनापेक्षा रासायनिक खतांवर मोठ्या प्रमाणात खर्च होणार आसून शेती करणं परवडणार नाही, बहुतेक शेतकरी यांनी सेंद्रिय खतांवर शेणखत मोठ्या प्रमाणात भर दिला आसून खरीब हंगामात नेहमीच खतांचा तुटवडा जाणवतो व चढ्या भावाने खते घ्यावी लागतात.. - सुरेश रामभाऊ कुताळ
नगरी दवंडी/प्रतिनिधी
गुंडेगाव ः 2021 चा खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वीच रासायनिक खतांची निर्मिती करणार्या कंपन्यांनी शेतकरी वापरत असलेल्या अनुदानित खतांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढविल्या आहेत. त्यामुळे येत्या खरीप हंगामात शेतकर्यांचा उत्पादन खर्च वाढणार आहे.खताबरोबरच मजुरी, विद्युत खर्च यावरही वाढणारा खर्च लक्षात घेता 2021 पर्यंत शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करणार, ही शासनाची घोषणा दिवास्वप्नच ठरणार असे दिसते. शेतमालाचे भाव आहे तसेच आहेत. वाढले तरी त्याचा फायदा शेतकर्यांऐवजी व्यापार्यांनाच होतो, असा दरवर्षीचा अनुभव असतो. शेतकर्यांचा माल बाजारात येतो तेव्हा बाजारात त्याचे भाव हमीभावापेक्षा कमी असतात. शासनाची हमीभावाने खरेदी करण्याची व्यवस्था नसते. शेतकरी अधिक वेळ थांबू शकत नाही. परिणामी, मिळेल तो भाव घेऊन शेतकरी आपला माल विकतो. खतांबरोबरच मजुरीचे दरदेखील वाढत आहेत.वीज देयकाचे दर नुकतेच 6 टक्क्यांनी वाढविण्यात आले आहे. एकीकडे शेतीवरील खर्चात वाढ होत आहे. म्हणजेच उत्पादन खर्च वाढत आहे. भाव ‘जैसे थे’ असल्याने उत्पन्न दरवर्षी घटत आहे. शासन 2021 पर्यंत शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करायची भाषा करीत आहे. शासनाचे खायचे दात वेगळे अन् दाखवायचे दात वेगळे असल्याचे शेतकर्यांतून बोलले जात आहे. खतांच्या दरवाढीवर शासनाने नियंत्रण आणावे, अशी शेतकर्यांची मागणी आहे.
No comments:
Post a Comment