पुण्यतिथी दिनी होणार गोपीनाथ मुंडेंच्या तिकिटाचे प्रकाशन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, May 29, 2021

पुण्यतिथी दिनी होणार गोपीनाथ मुंडेंच्या तिकिटाचे प्रकाशन.

 पुण्यतिथी दिनी होणार गोपीनाथ मुंडेंच्या तिकिटाचे प्रकाशन.

भारतीय डाक करणार लोकनेत्याचा सन्मान.


नवी दिल्ली ः
भारतीय डाक विभागाकडून दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. ही श्रद्धांजली अनोख्या पध्दतीने वाहिली जाणार आहे. पुण्यतिथी दिनी भारतीय डाक द्वारा त्यांची प्रतिमा असलेल्या तिकिटाचे प्रकाशन थेट दिल्लीवरून होणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा गोपीनाथ गडावर ऑनलाईन 3 जुनला पध्दतीने संपन्न होणार आहे. यंदाच्या पुण्यतिथी दिनी भारतीय डाक विभागाकडून गोपीनाथ मुंडेंचा त्यांचे छायाचित्र असलेल्या तिकिटाचे प्रकाशन करत गौरव केला जाणार आहे. हा सोहळा ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे. याआधी राष्ट्रसंत भगवान बाबा, यशवंतराव चव्हाण, सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर अशा महाराष्ट्रातील नामवंत व्यक्तींच्या तिकिटाचे प्रशासन भारतीय डाक कार्यालयाकडून करण्यात आलेले आहे.
भारतीय जनता पार्टीचे दिवंगत नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची पुण्यतिथी 3 जूनला असते. प्रतिवर्षी गोपीनाथ गडावर मुंडेंच्या समाधीवर नतमस्तक होण्यासाठी राज्यभरातून हजारो समर्थक उपस्थित राहत असतात. मात्र कोरोना संकटामुळे गेले वर्षी प्रतिवर्षी होणारा सोहळा आयोजकांकडून रद्द करण्यात आलेला होता. यावर्षीही कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा कुठल्याही गर्दीविनाच होण्याची शक्यता आहे.आपल्या लोकनेत्याचा होत असलेल्या या सन्मानामुळे बीड जिल्हा वासीयांची मान गर्वाने ताठ होणार आहे.

No comments:

Post a Comment