आष्टीत पोटच्या मुलाने बापावर झाडल्या गोळ्या - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, May 21, 2021

आष्टीत पोटच्या मुलाने बापावर झाडल्या गोळ्या

 आष्टीत पोटच्या मुलाने बापावर झाडल्या गोळ्या

आष्टी : आष्टी-शहरातील विनायक नगर भागामध्ये जन्मदात्या बापावर पोटाच्या मुलाने बंदुकीतून तीन गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी (दि.20) सायंकाळी 6 च्या सुमारास घडली.आष्टी पोलिसांनी याप्रकरणातील आरोपीला अटक केली असून उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे व पोलीस निरीक्षक सलीम चाऊस पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,संतोष किसन लटपटे (वय-50) असे जखमी इसमाचे नाव असून त्यांच्यावर पोटचा मुलगा असलेल्या किरण संतोष लटपटे (वय-24) याने घरगुती वादातून तीन गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या संतोष लटपटे यांच्या पोटावर झाडण्यात आल्याने ते यामध्ये गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले आहे.संतोष लटपटे यांना दारूचे व्यसन होते,यातून घरात सातत्याने छोटे-मोठे वाद होत असत यातून हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले असून आरोपीची सध्या कसून चौकशी सुरु आहे.
तीन महिन्यापूर्वी झाले होते सैन्य दलातून निवृत्त
दरम्यान संतोष लटपटे हे तीन महिन्यापूर्वी सैन्य दलातून निवृत्त झाल्याची माहिती आहे.त्यांच्याकडे बंदुकीचा परवाना होता.गुरुवारी सायंकाळी या बंदुकीतुनच पोटाच्या मुलाने तीन गोळ्या झाडल्या.यातील दोन गोळ्या या त्यांच्या पोटात गेल्या तर एक गोळी हुकली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
किरण लटपटे याने आपल्या पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की,त्याचे वडील संतोष लटपटे यांनी दारू पिऊन आपल्या आईला मारहाण सुरु केली होती, यानंतर मला राग अनावर झाल्याने आपल्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here