जीव धोक्यात घालून कर्त्यव्य बजावणार्‍या पोलीस व पत्रकारांना आयुष 64 गोळ्यांचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, May 18, 2021

जीव धोक्यात घालून कर्त्यव्य बजावणार्‍या पोलीस व पत्रकारांना आयुष 64 गोळ्यांचे वाटप

 जीव धोक्यात घालून कर्त्यव्य बजावणार्‍या पोलीस व पत्रकारांना आयुष 64 गोळ्यांचे वाटप


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या आयुष 64 ही आयुर्वेद गोळी करोनावर अत्यंत गुणकारी असल्याचे सिद्ध झाले आहे. करोना पासून वाचण्यासाठी आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीही ही आयुर्वेद गोळी अत्यंत उपयुक्त आहे. करोनाच्या संकट काळात शहरातील पोलीस कर्मचारी व पत्रकार हे आपला जीव धोक्यात घालून आपले कर्त्यव्य बजावत आहेत. त्यांचे करोना पासून संरक्षण व्हावे यासाठी आयुष 64 या आयुर्वेद गोळ्यांचे मोफत वाटप पोलीस कर्मचारी व पत्रकारांना करत आहे, अशी माहिती मनसेचे नेते डॉ.संतोष साळवे यांनी दिली.
शहरातील पोलीस कर्मचारी व पत्रकारांना डॉ. संतोष साळवे व निर्भय नवजीवन फाउंडेशनचे संदीप भांबरकर यांच्या वतीने आयुष 64 या आयुर्वेद गोळ्यांचे मोफत वाटप करण्याचा शुभारंभ कोतवाली पोलीस स्टेशन येथे झाला. या उपक्रमाबद्दल माहिती देताना संदीप भांबरकर म्हणाले, आयुष 64 या आयुर्वेद गोळ्यांच्या उपचाराने अनेकांनी यशस्वीपणे करोनावर मात केली आहे. तसेच शहरातील सर्व वृत्तपत्रांच्या पत्रकार बंधूंनाही कार्यालयात जावून या गोळ्या देणार आहोत.

No comments:

Post a Comment