6 वर्षांपासून फरार सराईत दरोडेखोर गजाआड ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, May 22, 2021

6 वर्षांपासून फरार सराईत दरोडेखोर गजाआड !

 6 वर्षांपासून फरार सराईत दरोडेखोर गजाआड !

दरोड्याचे तयारी असताना पकडले


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शिर्डी-सिन्नर रस्त्यावरील झगडे फाटा या ठिकाणी खडके नाल्याजवळ अंधारात दरोडा टाकण्यासाठी लपून बसलेल्या आठ ते नऊ दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने ताब्यात घेऊन गावठी कट्टा, लोखंडी कटावणी, बॅटरी, मोबाईल, लाकडी दांडके, असा मुद्देमाल जप्त केला असून या दरोडेखोरांवर दरोडा, जबरी चोरी, स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून लुटणे, मारामारी या सारखे गंभीर गुन्हे कोपरगाव, बेलवंडी, सिन्नर, नेवासा, वैजापूर, वाळुंज, विरगाव सिलेगाव या पोलीस ठाण्यात दाखल आहेत.

सदर घटनेची हकीकत अशी की, काल रात्री अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक कोपरगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना अनिल कटके यांना सायंकाळची वेळ गुप्त खबर्‍याकडून माहिती मिळाली की सराईत गुन्हेगार अशोक कागद चव्हाण हिंगणी कोपरगाव हा त्याचे सात ते आठ साथीदारांसह झगडे फाटा, शिर्डी सिन्नर रोड या ठिकाणी रस्त्याच्या कडेला दरोड्यांची तयारी करून कोठेतरी दरोडा घालण्याची तयारी मध्ये थांबलेले आहेत आता लगेच जाऊन छापा टाकल्यास ते मिळून येतील अशी माहिती मिळाल्याने त्यांनी ही माहिती कोपरगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत फरार व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेत असलेल्या पथकाचे प्रमुख मिथुन घुगे यांना कळवून मिळालेल्या माहितीनुसार खात्री करून कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या.
त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील मिथुन घुगे, गणेश इंगळे, मनोहर गोसावी, दत्तात्रय हिगडे, विश्वास बेरड, सुनील चव्हाण, शंकर चौधरी, संतोष लोंढे, दिनेश मोरे, विशाल दळवी, रवी सोनटक्के, मच्छिंद्र बर्डे, संदीप चव्हाण, जालिंदर माने, प्रकाश वाघ, सागर सुलाने, आकाश काळे, उमाकांत गावडे तसेच लोणी पो.स्टे.चे असीर सय्यद, अशोक शिंदे अशांनी मिळून दोन पंचांसह झगडे फाटा, शिर्डी सिन्नर रोड या ठिकाणी जाऊन सदर ठिकाणी रस्त्याच्या कडेला वाहने उभी करून अंधारात दबा धरुन पाहणी केली असता तेथे सिन्नर कडे जाणारे रोड लगत खडकी नाल्याजवळ अंधारात 8 ते 9 इसम हे दबा धरून वाहने येण्याची वाट पाहात असताना दिसले. त्यावेळी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्यांना सर्वांना घेराव घालून रात्री 8:30 वा. चे सुमारास ताब्यात घेऊन मिथुन घुगे यांनी त्यांना पोलीस स्टाप व पंचांची ओळख सांगून त्यांना त्यांची नावे व पत्ते विचारले असता त्यांनी अशोक कागद चव्हाण, वय 38 वर्ष, रा हिंगणी ता कोपरगाव, भाऊसाहेब कागद चव्हाण वय 42 वर्ष, रा हिंगणी ता कोपरगाव, परमेश्वर बाबासाहेब काळे वय 23 वर्ष, रा तुर्काबाद खराडी राजुरा ता गंगापूर जि औरंगाबाद, जिभाऊ गजानन काळे 23 वर्ष, रा गुढे वडगाव ता गंगापूर जि औरंगाबाद, देवगन कागद चव्हाण वय 24 वर्षे, रा हिंगणी ता कोपरगाव, बाबूल कागद चव्हाण वय 20 वर्ष, रा हिंगणी ता कोपरगाव, कागद मारुती चव्हाण वय 65 वर्ष, रा सदर, बेवो कागद चव्हाण वय 38 वर्ष, रा सदर,  मिजेश निजाम काळे वय 30 वर्ष, रा नरहरी रांजणगाव ता गंगापूर जि औरंगाबाद, असे असल्याचे सांगितले त्यांना रात्रीचे वेळी रस्त्याच्या कडेला थांबणे बाबत विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली म्हणून त्यांचे बाबत संशय आल्याने घुगे यांनी त्यांची पंचांसमक्ष अंग झडती घेतली असता त्यांची अंगझडती मध्ये एक गावठी कट्टा, एक जीवंत काडतूस, एक तलवार, एक लोखंडी कत्ती, लोखंडी कटावणी, एकसुरी, लाकडी दांडके, बॅटरी, मोबाईल असा एकूण 51,600/रु.की.चा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला त्याबाबत घेतलेल्या इसमाकडे एकत्र येण्याचे कारण व जप्त करण्यात आलेली हत्यारे याबाबत विचारपूस केली असता त्यांनी काही समाधानकारक माहिती सांगितली नाही हे इसम हे दरोड्याची तयारी करून कुठेतरी दरोडा घालण्यासाठी एकत्र आलेले असल्याची खात्री झाल्याने फिर्यादी संदीप विनायक चव्हाण नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांनी कोपरगाव तालुका पो.स्टे येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कार्यवाही कोपरगाव तालुका पो.स्टे करीत आहे.
ही कारवाई मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर, सौरभ कुमार अग्रवाल अपर पोलिस अधीक्षक अहमदनगर, दिपाली काळे मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व संजय सातव उपविभागीय पोलिस अधिकारी शिर्डी विभाग अहमदनगर यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here