नागापूर बोल्हेगाव पाण्याच्या टाकीची आ. संग्राम जगताप यांनी केली पाहणी, लवकरच नागापूर बोल्हेगाव परिसराला फेज 2 द्वारे पाणी मिळणार-आ. संग्राम जगताप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, May 26, 2021

नागापूर बोल्हेगाव पाण्याच्या टाकीची आ. संग्राम जगताप यांनी केली पाहणी, लवकरच नागापूर बोल्हेगाव परिसराला फेज 2 द्वारे पाणी मिळणार-आ. संग्राम जगताप

 नागापूर बोल्हेगाव पाण्याच्या टाकीची आ. संग्राम जगताप यांनी केली पाहणी

लवकरच नागापूर बोल्हेगाव परिसराला फेज 2 द्वारे पाणी मिळणार-आ. संग्राम जगतापनगरी दवंडी

अहमदनगर प्रतिनिधी- नागापूर, बोल्हेगाव परिसरातील फेज 2 पाणी योजनेचे काम पूर्ण झाल्यामुळे अनेक वर्षाचा पाणीप्रश्न मिटणार आहे.या भागाचा पाणीप्रश्न सुटण्यासाठी नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी नेहमीच प्रशासन पातळीवर पाठपुरवठा केल्यामुळे आज हे काम पूर्ण झाले आहे.नागापूर येथील साडेअकरा दशलक्ष लिटर पाण्याच्या टाकीमध्ये पाणी पडले आहे.तरी या परिसरातील नागरिकांनी फेज 2 जलवाहिनीला आपले नळ कनेक्शन घ्यावेत यापुढील काळामध्ये या भागाला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

         नागापूर येथील पाण्याच्या टाकीची पाहणी करताना आ.संग्राम जगताप यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, स्थायी समिती सभापती अविनाश घुले,विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, सभागृहनेता रवींद्र बारस्कर, नगरसेवक सागर बोरुडे,नगरसेवक राजेश कातोरे,नगरसेवक गणेश भोसले,सा.कार्यकर्ते बाळासाहेब बारस्कार,हनुमंत कातोरे,इंजि.परिमल निकम,इंजि.रोहिदास सातपुते उपस्थित होते.

       यावेळी बोलताना पुढे आ.संग्राम जगताप म्हणाले की,लवकरच अमृत पाणी योजनेचे काम पूर्ण होणार असून शहराला आता मुळा धरणावरून स्वतंत्र जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा केला त्यामुळे शहराला पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. शहराचा अनेक वर्षाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे असे ते म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here