वडिलांच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन.कोरोनाने 24 वर्षीय युवकाचे निधन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, May 29, 2021

वडिलांच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन.कोरोनाने 24 वर्षीय युवकाचे निधन

 वडिलांच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन.कोरोनाने 24 वर्षीय युवकाचे निधन

अहमदनगर ः शेंडी (ता. नगर) येथील संदेश ससाणे याचे वयाच्या 24 व्या वर्षी कोरोनाने निधन झाले. त्याला तीन बहिणी असून, एक बहिण दिव्यांग आहे. घरातील कर्ता मुलगा गेल्याने सदर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मयत मुलाचे वडिल बाळासाहेब ससाणे यांना देखील कोरोनाची बाधा झाली असून, ते शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. सदर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असून, या कुटुंबाला मुलींच्या उदरनिर्वाहासाठी व मयत मुलाच्या वडिलांच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन शिव रुद्र बहुद्देशीय संस्था व मित्र परिवाराच्या वतीने डॉ. भगवान चौरे यांनी केले आहे. मदत देऊ इच्छिणार्यांनी संस्थेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. तसेच बाळासाहेब ससाणे यांच्या इण्डियन ओवरसीज बँकचे खाते नं.088401000002716, आयएफएससी कोड- (आयओबीए) 0000884 यावर ऑनलाईन मदत पाठविण्याचे सांगण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here