स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने गोरगरीब कुटूंबियांना 1 हजार किराणा किटचे वाटप - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Monday, May 31, 2021

स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने गोरगरीब कुटूंबियांना 1 हजार किराणा किटचे वाटप

 स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने गोरगरीब कुटूंबियांना 1 हजार किराणा किटचे वाटप

संकट काळात गोरगरिबांना मदतीचा हात देणे गरजेचे -अध्यक्ष योगेश गलांडे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः मनुष्य जीवनावर कोरोना महामारीचे भयंकर संकट आले आहे. या विषाणूमुळे मनुष्य जीवनांवर विपरीत परिणाम झाला आहे.त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे.हा विषाणू संसर्ग विषाणू असल्यामुळे सरकारने लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्या मुळे अनेक नागरिकांचा रोजगार गेल्यामुळे अनेक कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे,या संघटनांमध्ये प्रत्येकाने मदतीचा हात पुढे केला पाहिजे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठाने सकारात्मक दृष्टिकोनातून व सामाजिक बांधिलकीतून गोरगरीब नागरिकांना एक महिनाभर पुरेल एवढा किराणा किट देण्यात आली. एम.आय.डी.सी मध्ये गेल्या 8 वर्षी पासून स्वराज्य कामगार संघटनेने प्रामाणिकपणे काम करून कामगारांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून दिला आहे.आता स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार असल्याचे प्रतिपादन प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश गलांडे यांनी केले.
नवनागापूर व एम.आय.डी.सी मधील गोरगरीब नागरिकांना स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने किराणा किटचे वाटप करताना प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश गलांडे, नवनागापूर चे सरपंच डॉ.बबन डोंगरे, उपसरपंच दत्ता पाटील सप्रे, ग्रामपंचायत सदस्य दीपक गीते, शंकर शेळके, नरेश शेळके, सुनील शेवाळे, आकाश दंडवते, उद्योजक अमोल घोलप, अमित बारावकर, संतोष कांबळे, संजय चव्हाण, सुभाष दांगट, अरबाज खान,अमोल घुटे,स्वप्नील खराडे, संतोष शेवाळे, सागर गलांडे, संतोष दळवी, अक्षय बहिर, विशाल गीते, हुसेन सय्यद, बाबा दांगट, हर्षल बिरंगळ आदी उपस्थित होते. दीपक गिते म्हणाले की, संकट काळामध्ये युवकांनी एकत्रित येऊन सामाजिक जबाबदारी सांभाळली पाहिजे, योगेश गलांडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून एम.आय.डी.सी व गजानन कॉलनी परिसरातील गोरगरीब कुटुंबीयांना सुमारे 1 हजार किराणा वस्तूंचे किट मोफत देण्यात येत आहे असे ते म्हणाले. शंकर शेळके म्हणाले की, स्वराज्य सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोरगरीब कुटूंबियांना आपला उदरनिर्वाह करण्यासाठी एक महिन्याचा किराणा मालाचे किट देण्यात येत आहे यामध्ये साखर, शेंगदाणे, बेसनपीठ, तेल, चहा पावडर, मिर्ची पावडर, तांदुळ, हळद, मीठ, गव्हाचा आटा, तूरडाळ, पोहे, आणि सोयाबीन आदी वस्तू या किराणा किट मध्ये आहे असे तर म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here