जिल्ह्याचा कोरोना पॉझिटीव्ह रेट 10 च्या आत; निर्बंध शिथील होण्याची शक्यता - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, May 31, 2021

जिल्ह्याचा कोरोना पॉझिटीव्ह रेट 10 च्या आत; निर्बंध शिथील होण्याची शक्यता

 जिल्ह्याचा कोरोना पॉझिटीव्ह रेट 10 च्या आत; निर्बंध शिथील होण्याची शक्यता

15 जूनपर्यंत लॉकडाउन वाढला !

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तर रुग्णसंख्या हव्या त्या प्रमाणात कमी न झाल्याने कडक निर्बंध 15 जून वाढवण्याचा निर्णय राज्य सरकराने घेतला आहे. असे असले तरी रुग्णसंख्या कमी असलेल्या ठिकाणी निर्बंध शिथील करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे कमी रुग्णसंख्या असलेल्या शहरांत आणि जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत खुली राहू शकतील. ज्या शहरे आणि जिल्ह्यांतील कोरोना पॉझिटिव्ह रेट 10 टक्क्यांपेक्षा कमी असेल आणि ऑक्सिजनयुक्त बेड्स 40 टकक्यांपेक्षा कमी भरलेले असतील अशा शहारांमध्ये दुकाने सकाळी 7 ते 2 पर्यंत खुली ठेवण्याची मुभा असेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. नगर जिल्ह्याचा कोरोना पॉझिटीव्ह रेट 9.98 असुन 10 पेक्षा कमी असल्यामुळे जिल्हाधिकारी,मनपा आयुक्त निर्बंध शिथील करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
राज्यात यापूर्वी अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची याआधी परवानगी होती. सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा (केवळ एकल दुकाने, मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील. तसेच शनिवार, रविवार ती बंद राहणार आहेत. ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून  त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. 29 मे 2021 च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाणार आहे. ज्या पालिका किंवा जिल्हा क्षेत्रात कोविड पॉझिटीव्हीटी दर 10 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 40 टक्क्यांपेक्षा कमी भरले असतील तर तिथे (12 मे 2021ब्रेक दि चेन आदेशाप्रमाणे) खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत.
सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरु ठेवता येणार आहे. सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा ( केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असणार आहेत.

No comments:

Post a Comment