राज्य पतसंस्था फेडरेशनला 101 चे दाखले देण्याची शासनाची परवानगी - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, May 19, 2021

राज्य पतसंस्था फेडरेशनला 101 चे दाखले देण्याची शासनाची परवानगी

 राज्य पतसंस्था फेडरेशनला 101 चे दाखले देण्याची शासनाची परवानगी


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्यातील पतसंस्थांना थकीत कर्ज वसुली व कारवाईसाठी लागणारे 101 चे दाखले मिळण्यास दिरंगाई होत आहे. 101 चे दाखले त्वरित मिळावे यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनच्या माध्यमातून राज्य सरकार कडे सतत पाठपुरावा करणारे राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या प्रयत्नास यश आले असून शासनाने नुकतीच राज्य पतसंस्था फेडरेशनला 101चे दाखले देण्याची परवांगी दिली आहे.
नगर जिल्ह्यात पतसंस्थांना 101 चे दाखले मिळण्यासाठी स्थैरनिधी सहकरी संघाच्या जुन्या कोर्टा जवळ असलेल्या कार्यालयात नव्याने जिल्हास्तरीय कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक आर.डी.मंत्री यांच्या हस्ते झाले. शासनाने सहाय्यक निबंधक परसेवा प्रदीप सानप यांची याठिकाणी अधिकारीपदी नियुक्ती केली आहे. यावेळी पतसंस्था फेडरेशनचे संचालक वसंत लोढा, स्थैर्यनिधी संघाचे संचालक अजिनाथ हजारे, नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे महासचीव नरेंद्र बागडे, बाळासाहेब खताडे, स्थैर्यनिधी संघाचे व्यवस्थापक महेश जाधव आदी उपस्थित होते.
यावेळी वसंत लोढा म्हणाले, उपनिबंधक कार्यालयातून पतसंस्थांना 101 चे दाखले मिळण्यास 6 महिन्यांहून अधिक काळ लागत असे. पतसंस्थांना हे दाखले त्वरित मिळावेत यासाठी राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या नेतृत्वाखाली अनेकदा आंदोलने केली. आता या प्रयत्नांना यश आले आहे. राज्य पतसंस्था फेडरेशनकडे 101 चे दाखले देण्याची परवानगी शासनाने दिल्याने राज्यातील सर्व पतसंस्थांना आता केवळ एक महिन्यात व पाचशे रुपये अत्यल्प दरात 101 चे दाखले मिळणार आहेत. शासनाच्या या महत्वाचा निर्णया मुळे पतसंस्था चळवळीला मोठी चालना मिळणार आहे. आता वेगाने थकीत कर्ज वसुली पतसंस्थांना करता येणार असल्याने पतसंस्थांना अधिक बळकटी व स्थैर्य मिळणार आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलेल्या सहकार्याबद्दल तसेच फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयेटे, मुख्यकार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे व स्थैर्यनिधीचे चेअरमन सुरेश वाबळे यांनी यासाठी सतत पाठवूरावा केल्याबद्दल सर्वांचे आभार.
विशेष अधिकारी प्रदीप सानप यांनी माहिती देताना सांगितले की, नगर जिल्ह्यातील सर्व पतसंस्थांनी आपले 101 चे दावे यापुढे या नव्याने सुरु झालेल्या जिल्हास्तरीय कार्यालयात दाखल करावेत. याठीकानाहून आता या दाव्यांवर वेगाने काम होणार असल्याने कमी अवधीत 101 चे दाखले मिळणार असल्याने सर्व पतसंस्थांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
नव्या जिल्ह्य कार्यालयात स्थैर्यनिधी संघाचे संचालक अजिनाथ हजारे यांची प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.  या नूतन कार्यालात लगेचच जिल्ह्यात अग्रणी असलेल्या समता पतसंस्था, दीनदयाळ पतसंस्था, प्रेरणा पतसंस्था, ज्योतीक्रांती पतसंस्था, लक्ष्मिनारायण पतसंस्था आदी संस्थांनी आपले 101 चे दावे दाखल केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here