आ.रोहितदादा विचार मंचाच्या वतीने खर्डा येथे ईद निमित्ताने मुस्लिम मदारी समाजातील 100 लोकांना अन्नदान करण्यात आले तसेच पत्रकार दत्तराज पवार यांनी पुढाकार घेतला होता..... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Sunday, May 16, 2021

आ.रोहितदादा विचार मंचाच्या वतीने खर्डा येथे ईद निमित्ताने मुस्लिम मदारी समाजातील 100 लोकांना अन्नदान करण्यात आले तसेच पत्रकार दत्तराज पवार यांनी पुढाकार घेतला होता.....

 आ.रोहितदादा विचार मंचाच्या वतीने खर्डा येथे ईद निमित्ताने मुस्लिम मदारी समाजातील 100 लोकांना अन्नदान करण्यात आले तसेच पत्रकार दत्तराज पवार यांनी पुढाकार घेतला होता..... नगरी दवंडी


 जामखेड तालुका प्रतिनिधी 

मुस्लिम समाज बांधवांचा महत्त्वाचा समजला जाणारा पवित्र रमजान महिना संपल्यानंतर ईद साजरी केली जाते त्यानिमित्ताने मुस्लिम व हिंदू समाज बांधव हे समाजातील गोरगरिबांना मदत करत असतात कोरोनाची महामारी असल्याने ईदची नमाज घरीच अदा करण्याचे आवाहन विचार मंचाच्या वतीने करण्यात आले होते कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने हातावरचे पोट असणाऱ्या मदारी समाजातील गोरगरिबांचे जीवन जगणे मुश्कील झाले असून अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे अशा वेळी मदत करणे ही गरज ओळखून येथील रोहितदादा पवार विचार मंचाच्या वतीने एक सामाजिक भान राखून खर्डा येथील अत्यंत गरीब व कष्टाळू असा मुस्लिम मदारी समाजाला  ईदच्या दिवशी 100 लोकांना अन्नदान करण्यात आले तर बंगला गल्लीतील मुस्लिम युवकांनी खर्डा शहरात दूध वाटप केले,यावेळी बोलताना दत्तराज पवार म्हणाले की कोरोनाच्या महामारीत लॉकडाऊन मुळे सध्या कोणताच रोजगार उपलब्ध नाही अशा काळात गोरगरीब व कष्टकरी कुटुंबातील लोकांचे हाल होत आहेत ही कोरोनाची महामारी संपेपर्यंत समाजातील सामाजिक, राजकिय क्षेत्रातील तसेच श्रीमंत लोकांनी मदत करण्याचे आवाहन पवार यांनी केले.या प्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य विकास शिंदे, टिल्लू पंजाबी, मोहम्मदभाई मुजावर, ख्वाजाभाई मुजावर,हुसेन मदारी, सरदार मदारी, गुलजार मदारी, हमीद मदारी, इत्यादी सह मदारी समाजातील बहुसंख्य महिला व लोक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here