कुकडीचे आवर्तन सोडण्यासाठी चालढकल खपवून घेणार नाही ः आ. पाचपुते - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 5, 2021

कुकडीचे आवर्तन सोडण्यासाठी चालढकल खपवून घेणार नाही ः आ. पाचपुते

 कुकडीचे आवर्तन सोडण्यासाठी चालढकल खपवून घेणार नाही ः आ. पाचपुते

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
श्रीगोंदा ः कुकडीचे आवर्तन सोडण्याकरिता 9 एप्रिल रोजी पुण्यात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली.
   पाचपुते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुकडीचे आवर्तन सोडण्यासाठी त्वरित पाऊले उचलणे आवश्यक आहे. त्यात चालढकल खपवून घेणार नाही. पाण्याची गरज व मागणी लक्षात घेऊन पुढील आवर्तनाचा निर्णय त्वरित घेतला जावा, यासाठी आपण सरकारचे वारंवार लक्ष वेधले होते. आता पुण्यात या संदर्भात बैठक बोलाविण्यात आली आहे.त्यात आवर्तनाचा विषय मार्गी लागेल.पाण्याची उपलब्धता व वापर या बाबत श्रीगोंदयावर अन्याय होणार नाही, याची लोकप्रतिनिधी म्हणून दक्षता घेतली जाईल. विसापूर कालव्याखालील शेतकर्‍यांना पाणी मिळावे या मागणीसाठी 5 एप्रिल रोजी श्रीगोंदयात कुकडी विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
   या बैठकीत पाणी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाईल. घोडद्वारे नदीवरील बंधार्‍यात पाणी सोडण्याची मागणी आपण यापूर्वी केली होती. सरकारने याची दखल घेतली आहे. 5 एप्रिल रोजी शिरूरचे आमदार अशोक पवार व माझ्या उपस्थितीत घोड मधून बंधार्‍यात पाणी सोडण्यात येणार आहे. त्याचा फायदा श्रीगोंदा व शिरूर तालुक्यातील नदी काठच्या शेतकर्‍यांना होईल,असा दावा आ.पाचपुते यांनी निवेदनात केला आहे.

No comments:

Post a Comment