राहुरी येथे यांत्रिकी उपविभाग सुरू करण्याचे आदेश - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, April 7, 2021

राहुरी येथे यांत्रिकी उपविभाग सुरू करण्याचे आदेश

 राहुरी येथे यांत्रिकी उपविभाग सुरू करण्याचे आदेश


नगरी दवंडी/प्रतिनिधी

राहुरी ः राहुरी येथे यांत्रिकी उपविभाग सुरू करण्याबाबतचा आदेश शासनाने दि .31 मार्च , 2021 रोजी निर्गमीत केला असल्याची माहिती उर्जा ,नगरविकास , आदिवासी विकास,उच्च व तंत्रशिक्षण ,आदिवासी विकास तसेच मदत व आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली .
    राहुरी तालुक्यात मुळा धरण, मुसळवाडी टेल टॅक ,दहा कोल्हापुर पध्दतीचे बंधारे आहेत. मुळा धरणामुळे राहुरी ,नेवासे ,शेवगांव पाथर्डी या तालुक्यातील सुमारे 80 हजार हेक्टर क्षेत्रास प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होत असून मुळा उजवा व डावा कालवा असून कालव्यांची लांबी सुमारे 70 कि.मी. आहे. तसेच भंडारदरा धरणाच्या प्रवरा उजव्या कालव्यामुळे तालुक्यातील बर्‍याचशा क्षेत्रास प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ होतो . घरण व कालव्यांच्या देखभाल दुरूस्तीची कामे यांत्रिकी विभागाकडून करण्यात येतात.यासाठी या विभागाकडे आवश्यक ती मशीनरी उपलब्ध आहे.परंतु राहुरी तालुक्यात जलसंपदा विभागाचा यांत्रिकी उपविभाग नसल्यामुळे तातडीच्या गरजेवेळी मशीनरी आणण्यासाठी विलंब होतो.राहुरी खुर्द येथे असलेल्या मुळा पाटबंधारे उपविभागाच्या कार्यालयात मशीनरी उभी करण्यासाठी पुरेशी जागा तसेच कार्यालयासाठी इमारतही उपलब्ध आहे.याठिकाणी यांत्रिकी उपविभाग मंजुर करण्याची मागणी तनपुरे यांनी जलसंपदा मंत्री श्री.जयंत पाटील यांचेकडे केली होती . ही मागणी श्री.जयंत पाटील यांनी तातडीने मंजूर केली.
    त्यानुसार राहुरी खुर्द येथील मुळा पाटबंधारे उपविभागाच्या आवारात हा उपविभाग सुरू करण्यास शासनाने दिलेली असून याबाबतचे कार्यालयीन आदेश जारी केले आहेत .याचा लाभ मुळा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील चारही तालुक्यांना तसेच अहमदनगर पाटबंधारे विभागाच्या राहुरी तालुक्यातील लाभक्षेत्रास मोठया प्रमाणावर होणार आहे.जलसंपदा विभागाच्या अद्ययावत मशीनरीचा हा उपविभाग तालुक्यात आल्याने शेती सिंचन अधिक सुलभ होणार आहे.

No comments:

Post a Comment