राहुरी शहरात बुधवारपासून 7 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, April 5, 2021

राहुरी शहरात बुधवारपासून 7 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन

 राहुरी शहरात बुधवारपासून 7 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन

नगरी दवंडी/प्रतिनिधी
राहुरी ः
राहुरी - शहरातील कोरोनाचे वाढते रुग्ण विचारात घेऊन त्यावर नियंत्रण आणणे साठी बुधवारपासून 7 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन स्वयंस्फूर्तीने करण्यात येणार आहे , अशी माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली .
   राहुरी शहरात वाढती कोरोना वाढ,जनता कर्फ्यु बाबत तहसील कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते .त्यांनी सांगितले की , राहुरी शहरात 7 ते 14 एप्रिल दरम्यान स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यु(लॉकडाऊन) राहील. शहरात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे . सात दिवसांच्या स्वयंस्फूर्तीने होणार्‍या जनता कर्फ्यू ला नागरिक चांगला प्रतिसाद देतील.नागरिकांनी आपल्या परिवारासह लहान मुलांची ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी असे आवाहन राज्यमंत्री तनपुरे यांनी केले .
   अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की , राहुरी तालुक्यात आज अखेर 10 हजार 100 नागरिकांनी कोरोना लसीकरणाचा लाभ घेतला . वांबोरी आणि राहुरी येथील ग्रामीण रुग्णालय आणि अन्य सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हे लसीकरण सुरू आहे .    लसीकरणाचा वेग वाढवणार असल्याचे तनपुरे यांनी सांगितले . कोरोना चा नवा स्ट्रेन लहान मुलांनाही परिणाम करू शकतो , त्यामुळे नागरिकांनी अधिक सावध होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले . सध्या कृषी विद्यापीठांमध्ये 300 बेड समतेचे र्लेींळव-19 सेंटर सुरू आहे . वांबोरी येथील ग्रामीण रुग्णालयात अक्सिजन व अन्य व्यवस्था असणारे 20 बेड उपलब्ध आहेत . राहुरी शहरात दोन खासगी रुग्णालयांमध्ये 15 बेडचे सेंटर उपलब्ध असून देवळाली प्रवरा येथे 40 बेडचे तर बालाजी मंदिर येथे खाजगी कोविड केअर सेंटर उभारण्याचा विचार आहे . राहुरी येथील स्वस्त धान्य दुकानदारांची आपण चर्चा केली आहे . उद्या स्वस्त धान्य दुकानातून धान्य वाटप सुरू होणार आहे .स्वस्त धान्य चा लाभ घेणार्‍या नागरिकांनी सोमवार , मंगळवार , बुधवारी आपले धान्य न्यावेत असेही त्यांनी सांगितले .
   तत्पूर्वी राज्यमंत्री तनपुरे ह्यांनी नगरपालिका सभागृहात शहरातील व्यापारी संघटना, स्वयंसेवी संस्था, डॉक्टर, नगरसेवक, शासकीय अधिकारी यांच्या संयुक्त बैठक घेतली . कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी येत्या गुरुवार पासून सात दिवस स्वयंस्फूर्तीने राहुरी शहरात कडकडीत लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला.
   तहसीलदार फसियोद्दीन शेख, पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पारख, किरण सुराणा, विलास तरवडे अनिल भट्टड संजीव उदावंत संतोष लोढा राजेंद्र सिन्नरकर, डॉ. जयंत कुलकर्णी, डॉ. प्रवीण कोरडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपाली गायकवाड, मुख्य अधिकारी डॉ  श्रीनिवास कुरे आदी उपस्थित होते.
    राज्य मंत्री प्राजक्त  तनपुरे म्हणाले, दूध डेअर्या सकाळी व संध्याकाळी एक तास चालू राहतील. मेडिकल दुकाने, दवाखाने चालू राहतील. शहरात 127  क्टिव्ह कोरोना रुग्ण आहेत. कोरोना मृत्यू वाढले आहेत. त्यामुळे, सर्वांनी एकमताने लॉकडाऊनचा निर्णय घेतला.

No comments:

Post a Comment